“कोल्हापूर ब्रेकिंग” शिये रामनगर येथील १० वर्षीय बेपत्ता मुलीचा सापडला मृतदेह

Spread the love
पुलाची शिरोली /  प्रतिनिधी कुबेर हंकारे

शिये येथील रामनगर परिसरातून १० वर्षीय  बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह सापडला असून या मुलीवर अत्याचार करून खुन केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.संशयास्पद मृतदेह सापडल्याने शिये परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.शिरोली पोलिस बुधवारी रात्रभर या मुलीचा तपास केला होता.आज गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता काशिद यांच्या उसाच्या फडात या मुलीचा मृतदेह आढळला.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सिपिआर रुग्णालयात दाखल केला आहे.

शिये रामनगर येथील १० वर्षीय परप्रांतीय मुलगी बुधवार दुपारपासून घरातून गायब झाली असल्याने तिच्या नातेवाईकांनी शिरोली पोलिसात तक्रार दिली होती.शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी व त्यांचे अन्य सहकारी व स्थानिक नागरिकांनी  शिये रामनगर परिसरातील सिसीटिव्ही कॅमेरे व परिसरातील विहीरी,ओढे,ऊसाच्या शेतात हि तपास केला पण कोणताच सुगावा हाती लागले नव्हता.मुंबई येथील घडलेल्या घटनेमुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण असताना शिये येथील हि १० वर्षाची मुलीच्या मृत्युच्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे य तपासाचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाला आहे.घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्रपंडित यांच्यासह सर्व विभागीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहेत.

error: Content is protected !!