ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे सरकारविरोधात बोंब मारो आंदोलन

Spread the love

शियेतील प्रकरणावरून सीपीआर परिसरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे सरकारविरोधात बोंब मारो आंदोलन
कोल्हापूर –

शिये येथील श्रीराम नगर येथील 10 वर्षाच्या मुलीचा मृतदेह शेतात आढळल्यानं कोल्हापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडालीय.या घटनेनंतर मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी  सीपीआरमध्ये पाठवण्यात आलाय.पोलीस अध्यक्ष महेंद्र पंडित यांनी घटनास्थळाला भेट दिलीय.यानंतर ही घटना कळताच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार,शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते सीपीआर परिसरात मोठ्या संख्येने गोळा झाले असून त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात बोंब मारो आंदोलन सुरू

केलंय.तसंच राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे.दरम्यान,कोल्हापूर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलं आहे.कोलकत्ता डॉक्टर महिलेची बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर राज्यात बदलापूरमध्ये शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती.या दोन घटनांवरून देशभरात संताप आणि उद्रेक सुरू असतानाच कोल्हापूरमध्ये सुद्धा भयंकर कृत्य समोर आलं आहे.

error: Content is protected !!