कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाड शहरातील 12 खेळाडूंनी बारामती येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेमार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय युथ,ज्युनियर आणि सीनियर स्पर्धेमध्ये तीन गोल्ड,पाच रौप्य पदक आणि चार कास्यपदक प्राप्त करत कुरुंदवाड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
राज्यस्तरीय जूनियर सीनियर स्पर्धेमध्ये 59 किलो वजनी गटात भूमिका मोहिते हिने 78 किलो स्नॅच आणि 101 किलो क्लीन अँड जर्क असे एकूण 179 किलो वजन उचलून सुवर्ण पदक प्राप्त केले.युथ स्पर्धेमध्ये 55 किलो वजनी गटात निशिगंधा कडोली हिने 62 किलो स्नॅच आणि 75 किलो क्लीन अँड जर्क असे एकूण 137 किलो वजन उचलून कास्यपदक प्राप्त केले.
युथ स्पर्धेमध्ये 45 किलो वजनी गटांमध्ये झिया अफसर पट्टेकरी हिने 52 किलो स्नॅच आणि 63 किलो क्लीन अँड जर्क असे एकूण 115 किलो वजन उचलून रौप्य पदक प्राप्त केले.55 किलो वजनी गटामध्ये निकिता सुनिल कमलाकर हिने 69किलो स्नॅच आणि 93 किलो क्लिन अँड जर्क असे एकूण 162 किलो वजन उचलुन ज्युनियर सुवर्ण पदक व सिनियर स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले.
64 किलो वजनी गटामध्ये राजलक्ष्मी जयसिंग पोवार हिने 63 किलो स्नॅच आणि 81 किलो क्लिन अँड जर्क असे एकूण 144 किलो वजन उचलुन ज्युनियर स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त केले. 59किलो वजनी गटामध्ये साक्षी महेश रानमाळे हिने 78 किलो स्नॅच आणि 100 किलो क्लिन अँड जर्क असे एकूण 178 किलो वजन उचलुन सिनियर स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले.
64 किलो वजनी गटामध्ये सई सुनिल कर्नाळे हिने 64 किलो स्नॅच आणि 78 किलो क्लिन अँड जर्क असे एकूण 142 किलो वजन उचलुन युथ स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले.71 किलो वजनी गटामध्ये ईश्वरी निशांत पोवार हिने 75 किलो स्नॅच आणि 90 किलो क्लिन अँड जर्क असे एकूण 165 किलो वजन उचलुन युथ स्पर्धेत सुवर्ण पदक ज्युनियर स्पर्धेत रौप्य पदक सिनिअर स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त केले.
81किलो वजनी गटामध्ये आराधीता महेश खोत हिने 50 किलो स्नॅच आणि 60 किलो क्लिन अँड जर्क असे एकूण 110 किलो वजन उचलुन युथ स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त केले.सर्व विजयी खेळाडूंना प्रशिक्षक निशांत पवार,विजय टारे, इजय माळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.