डॉक्टरांच्या संरक्षणार्थ कायदे आणखीन कडक करण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्याकडे पाठपुरवठा करणार – डॉ.सुभाष पाटील

Spread the love

पुलाची शिरोली / कुबेर हंकारे

कोलकता येथे झालेल्या डॉक्टर महिलेवरील अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ आज शिरोली डॉक्टर असोसिएशनचे वतीने आयोजित मूक मोर्चा आणि निषेध फेरी काढली.दरम्यान हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.यावेळी शिरोली डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सुभाष पाटील म्हणाले असोसिएशन फक्त मोर्चा काढून थांबणार नाही तर शासन दरबारी डॉक्टर यांचेवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात,तसेच कोलकता येथे झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी,कडक कायदे करण्यासंदर्भात राज्याचे आणि केंद्राचे आरोग्य मंत्री यांच्याकडे पाठपुरवठा करणार असल्याचे सांगितले.यावेळी पोलीस निरीक्षक पंकज गिरी,डॉक्टर असोसिएशनचे उपाध्यक्ष समर पद्माई, जिल्हा केमिस्टचे उपाध्यक्ष प्रल्हाद खवरे,हातकणंगले पंचायत समितीच्या सभापती डॉ.सोनाली पाटील,नवनिर्वाचित उपसरपंच बाजीराव पाटील,ग्रामपंचायत सदस्या हर्षदा यादव,ग्रामपंचायत सदस्य आरिफ सर्जेखान, महादेव सुतार,मोहम्मद महात,नवजीवनचे राजू सुतार,राष्ट्रसेवा मंडळाचे संजय पाटील,पंचायत समितीचे माजी सदस्य बबन संकपाळ, उद्योगपती सलीम महात,लोटस स्कूलचे संभाजी भोसले,बजरंग दलाचे प्रशांत कागले,उद्योगपती सचिन तावडे, डॉ.बी.ए.पाटील,डॉ.गंजेली, डॉ.ओंकार पाटील,डॉ.देशभुषण शिराळे,डॉ प्रशांत पाटील,डॉ.प्रदीप पाटील,डॉ इरफान मुल्ला,डॉ विनायक कोळी, डॉ.अभिषेक पुजारी, ,डॉ.इम्तियाज देसाई,डॉ.श्रीनिवास पाटील, डॉ.अझर मुल्ला डॉ,राहुल गुरव डॉ अक्षय हिरेमठ,डॉ. गिरीश आरेकर,डॉ.बेले,डॉ.किशोरी पाटील,डॉ.सारिका खवरे,डॉ श्रुती खवरे,डॉ निवेदिता हिरेमठ,डॉ स्वाती पाटील,शिरोली केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील, बाजीराव पाटील, हर्षल मणियार,अभिजीत चौगुले,सागर चौगुले,बापा आयुर्वेद शॉपीचे धैर्यशील पाटील यांच्यासह शिरोलीतील सर्वच औषध दुकानदार केमिस्ट आणि रक्त लघवी तपासणी लॅबचे सर्वच मालक व गावातील नागरिक उपस्थित होते.यावेळी प्रल्हाद खवरे,बाजीराव पाटील डॉ.गंजेली डॉ निवेदिता हिरेमठ,हर्षदा यादव यांनी मनोगतातून कोलकता घटनेचा निषेध व्यक्त केला. श्रद्धांजली डॉ योगेश खवरे यांनी वाहिली.हा मूकमोर्चा यशस्वी करण्यासाठी डॉ.निनल मणियार,डॉ.सुयोग मणियार,डॉ.अमोल तावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
error: Content is protected !!