ईश्वरी साधनेतून संकट व दुःख कमी होते – मनीषा बहेनजी

Spread the love

प्रजापिता ब्रह्माकुमारी केंद्रात मान्यवरांचा सत्कार

शिरोळ / प्रतिनिधी

मनुष्य जीवनाला सुख शांती समाधानाची खरी गरज आहे परंतु क्षणिक सुखाच्या मागे लागून माणूस आनंदापासून दूर जात आहे .ईश्वरी साधनेतून संकट व दुःख कमी होऊ शकते.त्यासाठी प्रार्थना साधनेसाठी वेळ देणे आवश्यक असून या साधनेतून सकारात्मक विचार आणि ऊर्जा मिळते. रक्षाबंधन म्हणजे बहीण भावापुरता मर्यादित आनंदी दिवस नाही.तर मनातील अंतरिक सदगुणांचा व सदविचारांची जोपासना करून अवगुण दूर करण्याचे सामर्थ्य रक्षाबंधन सोहळ्यात आहे हेच रक्षाबंधनाच्या नात्यामधून सिद्ध होते.असे मौलिक विचार प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शिरोळ केंद्राच्या संचालिका मनीषा बहेनजी यांनी व्यक्त केले.

 

येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शिरोळ केंद्रात रक्षाबंधन निमित्त शिरोळ शहरातील पत्रकार बांधव आणि तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी रक्षाबंधन आणि सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या.

 

केंद्राच्या संचालिका अर्चना बहेनजी यांनी स्वागत केले. या समारंभात आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त महेश पवार, आत्मसन्मान गौरव पुरस्कार प्राप्त चंद्रकांत भाट, बाळासाहेब कांबळे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच मनीषा बहेनजी यांनी उपस्थित सर्वांना राखी बांधून व्यसन व अविचारापासून अलिप्त राहण्याचे आवाहन केले.पत्रकार चंद्रकांत भाट आणि प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे शिरोळ तालुकाध्यक्ष सईद पिरजादे यांनी मनोगत व्यक्त केले.

 

या समारंभास कलाविश्व रंगभूमी संस्थेचे प्रमुख डॉ दगडू माने,प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे दिपाली मुगळे , अनिल देशमुख,राजश्री गवळी,वैशाली सुर्यवंशी,सुनिता पाटील,नारायण लोखंडे,प्रदीप आयगोळे,किसन चौगुले आदि उपस्थितीत होते.

error: Content is protected !!