जयसिंगपूर येथील नांदणी रोडवरील शाहूनगर रिक्षा स्टॉप चौकामध्ये भर दिवसा एका तरुणावर एका दुसऱ्या तरुणाकडून तलवार हल्ला केल्याची घटना आज रविवार
दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की जयसिंगपूर येथील नांदणी नाका शाहूनगर रिक्षा स्टॉप चौकाजवळ एक वृद्ध महिला व मोपेड दुचाकीवर एक तरुण एकमेकांसोबत बोलत असताना अचानक दुसऱ्या मोपेड दुचाकीवरून तीन तरुण त्या ठिकाणी येतात व अचानकपणे त्या तीन तरुणा पैकी एक तरुण गाडीच्या खालच्या बाजूकडून तलवार काढतो व अचानकपणे त्या वृद्ध महिला सोबत बोलत असणाऱ्या तरुणावर पाठीमागून हल्ला करतो,पण ती महिला सावध झाल्यामुळे तो वार वाचतो त्यानंतर ती वृद्ध महिला व तरुण या दोघांनी मिळून त्या तलवार हल्ला केलेल्या तरुणावर दगडफेक केल्यामुळे तो तरुण त्या ठिकाणहून पलायन करतो. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.हा सर्व प्रकार एका फिल्म मधील शूटिंग प्रमाणे वाटते खरे परंतु जयसिंगपूर मधील या घडलेल्या तलवार हल्ल्याच्या घटनेमुळे जयसिंगपूर शहरात खळबळ उडाली आहे.या हल्ल्याबाबत जयसिंगपूर पोलिसात नोंद झाली नाही.