ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ७८ स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Spread the love
पुलाची शिरोली / कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून स्कूलमध्ये ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्र‌मासाठी उपस्थित असलेले मन्सुर सुर्यवंशी हे भारतीय सैनिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजपूजन ज्येष्ठ पत्रकार विजय पवार,शिवसेना नेते शिवाजी पोवार,शिरोली हौसिंग सोसायटी चेअरमन बाबुराव चौगले,नितीन दळवी, नात्यान्ती गायकवाड यांच्या हस्ते ध्वजपुजन करण्यात आले.यावेळी त्यानतर छोट्या चिमुकल्यांनी, देशभक्तीगीतातुन वेगवेगळ्या जाती-धर्म,प्रांताचा भाषेतुन नृत सादरीकरण,कवायत,भाषण आशा विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला.यावेळी उपस्थित मान्यवराचे स्वागत स्कूलचे चेअरमन संतोष बाटे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन स्कूलच्या प्रिन्सिपल,सौ. मनिषा बाट,वाईस प्रिन्सिपल प्रतीक्षा पाटीला व सर्व शिक्षक वृंद यांनी केले.
error: Content is protected !!