शिरोळ / प्रतिनिधी
भारत देश स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या क्रांतीकारकाच्या आठवणी जपत शिरोळ शहरात 78 वा स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शिरोळ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते आज 15 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहण नंतर पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी शिरोळ तालुक्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नाईक,कॉन्स्टेबल उपस्थित होते,
शिरोळ नगरपरिषद मध्ये मुख्याधिकारी तथा प्रशासक निशिकांत प्रचंडराव यांच्या हस्ते आज 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले.येथील श्री पद्माराजे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायिले,यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,उपनगराध्यक्ष राजेंद्र माने,नगरसेवक,निवृत्त सैनिक, सर्वच विभागाचे अधिकारी, नगरपरिषद कर्मचारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
शिरोळ पंचायत समिती येथे वरिष्ठ सहाय्यक उदय भोसले यांच्या हस्ते आज 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी नारायण घोलप,बांधकाम विभाग,पाणी पुरवठा विभाग, बाल कल्याण,शिक्षण,कृषी, आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच श्री पद्माराजे विद्यालय,न्यू इंग्लिश स्कुल,कन्या शाळेच्या NCC व RSP विभागाचे विद्यार्थी यांनी ध्वजाला मानवंदना दिली.
शिरोळ प्रशासकीय कार्यालय येथे शिरोळ तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या हस्ते आज 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी ध्वजारोहण संपन्न झाले.यावेळी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,शिरोळ शहरातील सामाजिक, राजकीय,शैक्षणिक,विविध संस्थांचे अधिकारी, कर्मचारी,सर्वच शाळेचे विद्यार्थी, NCC व RSP,वजीर रेस्क्यू फोर्स,आधार रेस्कु फोर्स व शिरोळ पोलिसानी ध्वजाला मानवंदना दिली.
ध्वजारोहणानंतर तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी शिरोळ तालुक्यातील स्वातंत्र सैनिक व त्यांच्या कुटूंबियाचा सन्मान केला,तसेच शिरोळ तालुक्यातील जनतेला 15 ऑगस्ट स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र दिनानिमित्त दिवसभर शहरात क्रांतीकारकांच्या देशभक्ती गीताने उत्साही वातावरण होते.