प्रलंबित मागण्यासाठी १६ ऑगस्टपासून ग्रामपंचायतीचे बेमुदत काम बंद

Spread the love

२८ ऑगष्टपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन
ग्रामपंचायत कामकाजात समाविष्ट असणाऱ्या संघटनांचा निर्णय

शिरोळ / प्रतिनिधी

स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीचे कामकाजात समाविष्ट असलेले सरपंच संघटना ग्रामसेवक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना,संगणक परिचालक संघटना व ग्रामरोजगार सेवक संघटना या सर्वव घटकांच्या प्रलंबित मागण्याठी उद्या शुक्रवार दिनांक 16 ऑगष्ट 2024 पासून राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे बेमुदत काम बंद आदोलन करण्यात येणार आहे.

 

या सर्व संघटनांची आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे सरपंच परिषदेचे राज्याध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आंदोलनाची तयारी करण्यात आली.स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे राज्य संघटक महादेव जंगम स्वाभिमानीचे पुणे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील सरपंच परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्ष उज्ज्वला गोकुळे ग्रामरोजगार संघटना

 

 

अध्यक्ष विनोद चव्हाण व संगणक परिचालक संघटना राज्यसंघटक संतोष कुडले यांच्यासह सर्वच संघटना पदाधिका-यांची पत्रकार भुवन पुणे येथे पत्रकार परिषद झाली.यामध्ये उद्या शुक्रवार दिनांक 16 ऑगष्ट 2024 पासून ग्रामपंचायतीचे कामकाज मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत बंद रहाणार आहे. तसेच वेळेत यावर शासनाने तोडगा न काढल्यास दिनांक 28 ऑगष्ट 2024 पासून

 

 

आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सर्वच संघटनांनी एकत्रित येवून धरणे आदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.
ग्रामपंचायतीचे कामकाजात सामील असलेल्या सर्वच घटकांच्या मागण्यासाठी वेळोवेळी राज्य शासनाकडे संघटनेच्यावतीने प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा

 

करूनसुद्धा शासनाने या सर्वांच्या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे यासाठी न्यायिक व हक्काच्या मागण्यासाठी ग्रामपंचायत कामकाजात सामील असलेल्या सरपंच संघटना, ग्रामसेवक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना,संगणक परिचालक

 

 

संघटना व ग्रामरोजगार संघटना या सर्वांनी एकत्रित येवून राज्यभरात बेमुदत काम बंद आदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सर्वच सेवा या बेमुदत काम बंद आदोलनामुळे बंद रहाणार आहे.

 

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेकडून ग्रामपंचायत कर्मचारी यांना वेतनश्रेणी लागू करून आकृतिबंध सुधारणा करण्यात यावी. ग्रामपंचायत कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी दर्जा देण्यात यावा. वसुलीची अट रद्द करण्यात यावी. कलम ६१ रद्द अथवा बदल करण्यात यावे. ग्रामपंचायत कर्मचारी यांना निवृत्ती वेतन लागू करावे.

 

प्रायव्हेट फंडाची स्वकम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा करण्यात यावी. ग्रामपंचायत कर्मचारी यांना आदर्श ग्रामपंचायत कर्मचारी पुरस्काराने तालुकास्तर, जिल्हास्तरावर सन्मानित करण्यात यावे यासह अन्य मागणे करण्यात आल्या आहेत.

 

 

सरपंच परिषदेकडून राज्यातील सरपंचांच्या मानधनात वाढ करून ते नियमित मिळावे. ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक मिटिंग भत्त्यामध्ये वाढ करण्यात यावी. मुंबई येथे सरपंच भवन बांधून मिळणे सरपंच कालावधीत विमा व तदनंतर पेन्शन योजन लागू करणे.

 

 

कर वसुलीसाठी शासनाचे सहकार्य मिळावे यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत.ग्रामसेवक संघटनेकडून राज्य कर्मचाऱ्या प्रमाणे पेन्शन लागू करणे.कलम ४९ सुधारणा करणे अतिरिक्त काम कमी करणे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी दोन्ही पदे एकत्र करून एक पद निर्माण करणे, यासह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत.

 

संगणक परिचालक यांच्याकडून यावलकर समितीचे शिफारशी स्विकारून ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी. वेतन श्रेणी लागू करावी. ग्रामपंचायत कर्मचारी यांचे प्रमाणे सेवा व सुविधा यांचा लाभ मिळावा. प्रायव्हेट फंड योजना, पेन्शन योजना लागू करण्यात यावी. इतर मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

 

 

ग्रामरोजगार सेवकांकडून कायम कर्मचारी म्हणून नेमणूक करावी. किमान वेतन मिळणे ग्रामपंचायत कर्मचारी यांचे प्रमाणे सेवा व सुविधांचा लाभ मिळावा. यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत.या मागण्यासाठी ग्रामपंचायतीच्या कामकाजात सामीलअसलेले सरपंच संघटना ग्रामसेवक संघटना

 

 

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना,संगणक परिचालक संघटना तसेच ग्रामरोजगार सेवक संघटना या सर्व संघटना एकत्रित येवून ग्रामपंचायतीचे कामकाज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत बेमुदत काम बंद ठेवून आदोलन करणार आहेत तसेच दिनांक 28 ऑगष्ट 2024 पासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

 

यावेळी महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचचे राज्य सल्लागार विजय चव्हाण,राज्य सदस्य राजकुमार पाटील, राज्य उपाध्यक्ष हसीना मुल्ला,पुणे विभागीय अध्यक्ष शांतीनाथ धरणगुत्ते, जिल्हा समन्वयक राहुल कांबळे, जिल्हाध्यक्ष प्रशांत तांदळे, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी पाटील,

 

 

शिरोळ तालुकाध्यक्ष अनिल कोरे, तालुका सचिव सतीश माने,हातकणंगले तालुकाध्यक्ष राजकुमार वायदंडे,तालुका समन्वयक सुनिल धनवडे,अखिल भारतीय सरपंच परिषदेचे कोल्हापूर पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष पोपट भोकरे यांच्यासह राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!