डॉ अरविंद माने यांनी जोपासला दातृत्वाचा वारसा : चंद्रकांत भाट

Spread the love

मुलीच्या वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत शाळेला दिली संगणकाची भेट

शिरोळ / प्रतिनिधी

भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष आणि शिरोळचे माजी नगरसेवक डॉ अरविंद माने यांनी व त्यांच्या परिवाराने नेहमीच समाजात दातुत्वाचा वारसा जोपासत वंचित उपेक्षितांना मदत करण्याची भूमिका पार पाडली आहे असे प्रतिपादन राजाराम विद्यालय शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य चंद्रकांत भाट यांनी केले.

 

माजी नगरसेवक डॉ अरविंद माने यांनी आपली सुकन्या चिन्मयीच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत येथील राजाराम विद्यालयास संगणक आणि संगणक टेबल भेट देऊन या परिसरातील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी यासाठी मदत केली संगणक प्रदान सोहळ्यात चंद्रकांत भाट हे बोलत होते.

 

या समारंभात बोलताना डॉ अरविंद माने म्हणाले की या राजाराम विद्यालयात शिक्षण घेऊन अनेकजण मोठे झाले आहेत ही शाळा सर्वात जुनी शाळा आहे.त्यामुळे ही शाळा टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा व शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी माने परिवार नेहमीच तत्पर राहील असे आश्वासन त्यांनी दिले.

 

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले शाळेच्यावतीने केक कापून व भेटवस्तू देऊन चिन्मयीचा वाढदिवस साजरा करण्यात आला माने परिवाराच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांना चॉकलेट देण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ओळखपत्र आणि कंबरेच्या पट्ट्याचे वाटप करण्यात आले.

 

या समारंभास सौ सारिका माने,पत्रकार बाळासाहेब कांबळे, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ शितल जगदाळे,सदस्या प्रियांका इंगळे, मनीषा जाधव, भाग्यश्री चव्हाण, सारिका सकट, स्वाती कांबळे, ज्योती गावडे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

स्वागत व सूत्रसंचालन सुनील घुमण्णा यांनी तर प्रास्ताविक त्रिशला येळगुडे यांनी केले रवींद्र वाघ यांनी आभार मानले.

error: Content is protected !!