पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील प्राथमिक विद्या मंदिर व माध्यमिक प्रशाळा विलास नगर येथे आज मंगळवार दि १३ ऑगस्ट रोजी प्रशांत कागले व त्यांचे बंधू सचिन कागले यांचे हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करत ७८ व्या स्वातंत्र्योत्सवाचे पहिले पुष्प गुंफले गेले.रांगोळी व फुलांची आरास करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत वाकरेकर यांनी केले.यावेळी प्रमुख पाहुणे प्रशांत कागले म्हणाले शिरोली गावामध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांची पटसंख्या पाहता या शाळेची पटसंख्या उल्लेखनीय आहे. येथील शिक्षक वृंद मनापासून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम अहोरात्र करीत असतात.तसेच विद्यार्थ्यांनीही पहिली ते दहावी हा त्यांच्या आयुष्यातील एक सुवर्ण क्षण असल्याचेही सांगितले.कारण तुम्ही शाळेला का आला नाही, शाळेचा अभ्यास का केला नाही या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला मार्क का कमी पडले याची जवळून विचारपूस केली जाते,तसे दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांची कोणीही चौकशी करीत नसतात मात्र पहिली ते दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर लक्ष देऊन परीक्षेची तयारी केली जाते.विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्याची सोडवून केल्याने विद्यार्थ्यांनाही अभ्यासाची गोडी निर्माण होते,यामुळे या शाळेतील विद्यार्थी भविष्यात उच्च पदावर जातील अशी अपेक्षा कागले यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमासाठी पत्रकार कुबेर हंकारे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन शशिकांत पाटील यांनी केले.तर नियोजन व्ही व्ही जाधव यांनी पाहिले.प्रदिप गुरव यांनी उपस्थितांचे आभार मानले.