पुलाची शिरोली / कुबेर हंकारे
वारसा हक्क नोंदणीसाठी चार हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी टोप भूमापन कार्यालयातील अधिकारी तुषार सोनवणे वय वर्ष ४५ रा.सांगली व त्याचा सहकारी अमर चौगुले या दोघांना चार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभाग पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.ही कारवाई आज मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास नागाव येथे केली.याबाबत सविस्तर माहिती की अंबपवाडी ता.हातकणंगले येथील तक्रारदार यांनी व भूमापन कार्यालयाचे अधिकारी तुषार सोनवणे यांच्याकडे वारसा हक्क नोंदणीसाठी अर्ज केला होता.यावेळी त्यांनी सोनवणे यांनी आठ हजार रुपयाची लाच मागितली दोघांच्या तडजोडीने 4 हजार रुपये देण्याचे ठरले ही रक्कम नागाव येथे घेऊन येण्यास तक्रारांना सांगितले होते.दरम्यान तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला दिली.त्यानुसार आज मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास लाच लुचपत विभागाने सापळा लावून सोनवणे याला चार हजार रुपयाची लाच घेताना पकडले.यावेळी याच्यासोबत त्यांचा पंटर अमर चौगुले रा.हातकणंगले सोबत होता.सदरची कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील अतिरिक्त कार्यभार असणारे पोलीस उपाधीक्षक बापू साळुंखे यांच्यासह सहाय्यक फौजदार प्रकाश भंडारे,सुनील मोरे,पोलीस हवालदार विकास माने,सुनील घसाळकर,सुधीर पाटील यांच्या पथकाने केली.