उद्योजकांच्या प्रगतीसाठी छत्रपती शाहू इंडस्ट्रियल कटिबद्ध : डॉ अशोकराव माने

Spread the love

वार्षिक सभेत डॉ माने यांना आमदार करण्याचा उद्योजकांचा निर्धार

शिरोळ / प्रतिनिधी 

खडतर आणि कठोर परिश्रम घेत छत्रपती शाहू को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट या संस्थेच्या माध्यमातून वाटचाल करीत असताना ग्रामीण भागातील तरुणांना उद्योग उभा करण्याची संधी मिळाली यामुळे परिसरातील हजारो बेरोजगारांच्या हातांना काम मिळून त्यांच्या जीवनाची यशस्वी वाटचाल सुरू आहे.याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे यापुढेही संस्थेच्या माध्यमातून उद्योजकांच्या प्रगतीसाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेऊन संस्थेचा विकास केला जाईल असे आश्वासन संस्थेचे संस्थापक चेअरमन दलितमित्र डॉ अशोकराव माने यांनी दिले.

दरम्यान दलितमित्र डॉ अशोकराव माने यांनी 39 वर्षांपूर्वी एका फोंड्या माळरानावर छत्रपती शाहू को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट दलितमित्र डॉ अशोकराव माने उद्यमनगर या संस्थेची स्थापना करून उद्योग निर्मितीसाठी चालना देऊन परिसरात नंदनवन फुलवले याकरिता त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले आता हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून त्यांना आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी या संस्थेतील सर्व उद्योजक जीवाचे रान करतील असा विश्वास या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अनेक उद्योजकांकडून व्यक्त करण्यात आला.

 

मौजे आगर येथील रोटरी ग्रीन सिटी जयसिंगपूरच्या सभागृहात छत्रपती शाहू को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटची 39 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात पार पडली.संस्थेचे व्यवस्थापक सुरेंद्र तिवडे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व तेरा विषयांना सर्वानुमते टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली.

 

संस्थेचे व्हॉईस चेअरमन संजय पाटील चिपरीकर हे स्वागत व प्रास्ताविक करताना म्हणाले की संस्थेचे संस्थापक दलितमित्र डॉ अशोकराव माने (बापू) यांनी या संस्थेच्या प्रगतीसाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहे. त्यांच्यामुळेच या ठिकाणी उद्योजकांना उद्योग उभा करण्याची संधी मिळाली व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला.या संस्थेच्या माध्यमातूनच त्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊन त्यांच्या कुटुंबाची प्रगती साधता आली आता सर्व उद्योजकांनाही माझे आवाहन आहे.की बापूंच्यामुळे या संस्थेतील सर्व उद्योजकांची चांगल्या पद्धतीने प्रगती झाली आहे.

 

 

आता बापूंनाही हातकलंगलेमधून आमदार होण्याची संधी मिळाली आहे.गतवेळी अल्पमताने पराभव झाला आहे. मात्र खचून न जाता बापू पुन्हा जोमाने या मतदारसंघात सक्रिय होऊन समाजकारण व राजकारण करीत आहे. त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी ठामपणे उभे राहून बापूंना आमदार करण्यासाठी प्रयत्न करूयात असे सांगून त्यांनी सर्वांचे स्वागत करत संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.

 

संस्थेचे जेष्ठ सभासद व जयसिंगपूर बाजार समितीचे संचालक सुभाषसिंग रजपूत म्हणाले की दलितमित्र डॉ अशोकराव माने यांनी कठोर मेहनत घेऊन अनेक संस्था नावरूरपास आणलेल्या आहेत.मात्र छत्रपती शाहू को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट ही त्यांची मातृसंस्था आहे. या संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांनी अपार कष्ट घेतले आहेत. यामुळे या परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याची संधी मिळून हजारोंच्या हातांना काम मिळाले आहे.बापूंनी समाजाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत.त्यांना आमदार करण्यासाठी आपणही जीवाचे रान करूया असे आवाहन त्यांनी केले.

 

यावेळी संस्थेचे संचालक सुरेश रेडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.आभार संचालक भरत माणगांवे यांनी मानले. या वार्षिक सभेस संचालक निलेश शिंदे,डॉ अरविंद माने, दयानंद जाधव,पंकज दौंडे,बबन उर्फ सदाशिव बन्ने,सौ. रेखा कांबळे,सौ.अश्विनी गायकवाड,सौ.सुधा वायचळ, कार्यलक्षी संचालक सागर कोळी,

 

 

स्वामी समर्थ सूतगिरणीचे कार्यकारी संचालक सुहास राजमाने, उद्योजक अतुल साखरपे,राम बोडगे,चंद्रकांत टारे, चंद्रशेखर मुंडे,सागर चावरे,विलास बिंदगे,दीपक बुबणे, संतोष माने यांच्यासह संस्थेचे सभासद व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!