रोटरी क्लब हेरिटेज सिटीचे लोकोपयोगी कार्य कौतुकास्पद : गणपतराव पाटील 

Spread the love
शिरोळात पासपोर्ट कॅम्पचा शुभारंभ
शिरोळ / प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीने नेहमीच समाजहित डोळ्यासमोर ठेवून लोकोपयोगी उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू ठेवला आहे.या संस्थेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून पासपोर्ट कॅम्पच्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत पासपोर्ट मिळण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. असे प्रतिपादन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांनी केले.
येथील दत्तनगरमधील नॅप्स्टर इंटरनेट कॅफे येथे डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील सोशल फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अल्पदरात नवीन पासपोर्ट काढणे व जुने पासपोर्ट नूतनीकरण करणे या कॅम्पचा शुभारंभ सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
दत्त साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल उद्यानपंडित गणपतराव पाटील कारखान्याचे ज्येष्ठ संचालक अनिलराव यादव दरगू गावडे यांचा रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्यावतीने सत्कार करण्यात आला.
स्वागत रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील (भैय्या) यांनी तर प्रास्ताविक सचिव मेजर प्रा के एम भोसले यांनी केले.आभार इव्हेंटचेअरमन राहुल यादव यांनी मानले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील (माऊली), ट्रेझरर चंद्रकांत भाट, सदस्य संजीव पुजारी, विराजसिंह यादव, अनिकेत जोशी, संजय तुकाराम शिंदे, उल्हास पाटील, रणजीत जगदाळे, अमित जाधव,डॉ अरविंद माने, डॉ उमेश कळेकर,
डॉ अजितकुमार बिरनाळे, आप्पालाल चिकोडे, सचिन सावंत, श्रीकांत जाधव, शरद उर्फ बापू मोरे,शिवाजी कोळी,सुरेश देशमुख,गजानन पाटील,विक्रमसिंह भोसले, डॉ सुभाष भंडारे, महेश माने,संजय रामचंद्र शिंदे, संदीप कांबळे,दत्त ग्राहक भांडारचे व्यवस्थापक सदानंद घोरपडे,
दत्त कारखान्याचे संचालक महेंद्र बागे, प्रताप केसरकर, सुहास मडिवाळ, सुनील माने, दीपक काळे,महेश मोरे, विकी केसरकर, पंकज शहापुरे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
error: Content is protected !!