शिरोळमध्ये देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
शिरोळ / प्रतिनिधी
आजच्या विद्यार्थ्यांना आपल्या देशाचा आणि थोर क्रांतिकारकांचा इतिहास समजणे आवश्यक आहे. त्यांच्यात देशभक्ती निर्माण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ केंद्रीय शाळा व कन्या शाळा दत्तनगरने आयोजित केलेल्या देशभक्तीपर गीतांचा उपक्रम स्तुत्य आहे असे प्रतिपादन शिरोळ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ भारती कोळी यांनी केले.
येथील श्री दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या सभागृहात पृथ्वीचंद माछरेकर निर्मित द ग्रेट करा ओके म्युझिक शो च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी श्री दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ आणि केंद्रीय शाळा व कन्या शाळा दत्तनगरच्या वतीने क्रांती दिनानिमित्त आयोजित करण्यात आला.
देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी सौ. कोळी या बोलत होत्या.यावेळी कलाकारांनी उत्कृष्ट व बहारदार देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.पृथ्वीचंद माछरेकर, प्रदीपराज आढाव,अभिषेक राणे, पुनम जोशी, विद्या कांबळे,दिव्या मगदूम, दीपक जमणे, शुभनीती माछरेकर,
शिवाजी कोळी, अंजली शिंदे या कलाकारांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.दिलीप कोळी यांनी सूत्रसंचालन केले.शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत यांनी मनोगत व्यक्त केले विराजसिंह यादव यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख अण्णा मुंडे केंद्रीय शाळा दत्तनगरचे मुख्याध्यापक नामदेव सन्नके कन्या शाळेच्या
मुख्याध्यापिका सौ संगीता घोरपडे,शिक्षक अस्मिता सुतार,दिलीप कोळी ,राजाराम सुतार ,इनास बारदेस्कर , किरण पाटील ,सुजाता खोत,रुपाली भगाटे,शरद सुतार, अनुराधा शिनगारे,विद्या पाटील,युवराज पाटील,
महेश कांबळे,प्रीतम गवंडी,रिहाना कोठावळे,पत्रकार बाळासाहेब कांबळे,रोटेअमित जाधव यांच्यासह मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील (भैय्या) यांनी स्वागत केले.ट्रेझरर चंद्रकांत भाट यांनी प्रास्तावित केले.सेक्रेटरी प्रा के एम भोसले यांनी आभार मानले.