क्रांतिकारकांचा इतिहास आजच्या पिढीसमोर मांडणे आवश्यक – अनिलराव यादव 

Spread the love

शिरोळ एसटी स्टँड मित्र मंडळाच्यावतीने क्रांती दिन साजरा

शिरोळ / प्रतिनिधी 

दीडशे वर्षे इंग्रजांच्या गुलामीत अडकलेल्या आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी बलिदान दिले. त्यांच्या प्राणाच्या आहुतीने खऱ्या अर्थाने आपला देश परकीय गुलामगिरीतून मुक्त झाला आहे.अशा या थोर क्रांतिकारकांचा इतिहास आजच्या तरुण पिढीसमोर मांडणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांनी केले.

 

येथील एसटी स्टँड मित्रमंडळाच्या वतीने 9 ऑगस्ट क्रांतीदिन उत्साहात साजरा करण्यात आला या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून यादव बोलत होते.
शिरोळ परिसरातील उपस्थित सर्व माजी सैनिकांचे हस्ते क्रांती स्तंभाचे पूजन करून राष्ट्रगीत गाऊन थोर क्रांतिकारकांना मानवंदना देण्यात आली.

 

यानंतर ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब माळी यांनी स्वागत व प्रस्तावित केले. उपस्थित माजी सैनिक आणि देहदान केलेल्या व्यक्तींचा व रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे नूतन खजिनदार चंद्रकांत भाट यांच्यासह अन्य मान्यवरांच्या  पुष्पगुच्छ देऊन मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

 

माजी सैनिक संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय माने शिरोळ तालुकाध्यक्ष दिनकर घाटगे शिरोळ शहराध्यक्ष संजय इंगळे यांनी आपल्या मनोगतामध्ये देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात थोर क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची बाजी लावली आहे अशा शहीद झालेल्या क्रांतिकारकांच्या स्मृती जतन करण्यासाठी देशात सर्वत्र क्रांती दिन साजरा केला जातो.

 

या माध्यमातूनही तरुण पिढीला देशाचा खरा इतिहास समजला जातो असे सांगून मंडळांचे क्रांती दिनानिमित्त माजी सैनिकांचा केलेल्या सत्कारबद्दल आभार मानले
यावेळी माजी सैनिक मोहन कोगे,सुधाकर अरदाळे, हणमंत काळे, बापू मुल्ला, संपत इंगळे,शहाजी काळे, आनंदा खोत, दत्तात्रय गावडे, दगडू कांबळे ,संभाजी गावडे,रामदास गावडे, बबन गावडे, पोपट कांबळे ,पांडुरंग घाटगे, रमेश काळे, शिवाजी कांबळे, दादासो काळे, विश्वास पाटील, रामदास गायकवाड, जयसिंग शिंगाडे ,हरी धुमाळे ,सहदेव कुंभार, वसंत माने, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे,

 

 

पांडुरंग पोवार, परवेज मेस्त्री राजेंद्र पूदें अमर उर्फ नाना कदम बाळासाहेब पाटील, सयाजी पाटील, मारुती कोळी ,राजाराम माने, दीपक गावडे,रणजीत पवार, सर्जेराव कांबळे, मारुती जाधव,दरगु पाटील, पकाश पाटील, यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते यादव सोसायटीचे चेअरमन डी बी चव्हाण यांनी आभार मानले.

error: Content is protected !!