कुरुंदवाड / प्रतिनिधी
कृष्णा पंचगंगा नदीच्या महापुराने शिरोळ तालुक्यातील शेती पशुधन सह नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढून धडक देणार असल्याचा इशारा शिवसेनेचे(उबाठा) माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी दिला आहे.
कुरुंदवाड येथील पूरग्रस्त स्थलांतर करण्यात आलेल्या निवारा केंद्रांना भेट देण्यासाठी आले असता माजी आम. पाटील सरूडकर बोलत होते.यावेळी माजी.आम.उल्हास पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे,तानाजी आलासे,बबलू पवार आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी पुढे बोलताना माजी आम. पाटील सरूडकर म्हणाले सरकारने महापुराची आपत्ती टाळण्यासाठी 3हजार,200 कोटी रुपयांची तरतूद केल्याची फक्त रकमेच्या आकड्याची घोषणा केली आहे. नेमके करणार काय याचा आराखडा अध्यापित तयार ही नाही आणि त्याची घोषणाही करण्यात आलेली नाही.
कागदी घोडे नाचविण्याचा खेळ सरकार करत आहे.
महापुरावर नियंत्रण आणण्यात सरकारला अपयश आले आहे. सरकार अथवा प्रशासन पूरग्रस्तांना कुठेही मदत करताना दिसून येत नाही. महापुराचे पाणी ओसरले आहे. शेतीचे पंचनामे करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी घर पडझडीचे पंचनामे करून घरकुल योजनेचा
तात्काळ लाभ द्यावा स्थलांतरित पूरग्रस्तांना सहानुग्रह अनुदान द्यावे.यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाने धडक देणार असल्याचे सांगितले.
यावेळी तानाजी आलासे,बबलू पवार,राजू बेले,फैसल पटेल,अनिकेत बेले,नंदू माने आदी उपस्थित होते.