शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्या – राष्ट्रवादीचे निवेदन

Spread the love

शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्या
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय (शरदचंद्र पवार गट)ची निवेदनाद्वारे मागणी

शिरोळ / प्रतिनिधी 

महापुराने नुकसान झालेल्या शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना व शेतकऱ्यांना व पूर परिस्थितीमध्ये मयत झालेल्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत करण्यात यावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

सामाजिक न्याय (शरदचंद्र पवार गट) यांच्यावतीने शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना देण्यात आले आहे
शिरोळ तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी जनतेला व शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना दरवर्षी महापुराचा फार मोठा फटका बसत आहे त्यामुळे शेतामध्ये मोलमजूर करणारी जनता व शेतकरी निराश झाले आहेत तरी महाराष्ट्र शासनाने पूरग्रस्त कुटुंबाला तात्काळ वीस हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान द्यावे व शेतकऱ्यांना ज्य पिकाचे नुकसान झाले आहे त्याचे तात्काळ पंचनामे करून एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी गाई म्हशी मयत झाली असतील किंवा पुरामध्ये वाहून गेली असतील त्याचे पंचनामे करून त्या पशुपालक शेतकऱ्यांना तात्काळ 70 हजार रुपयांची मदत मिळावी व जे छोटे मोठे उद्योजक आहेत यांना 50 हजार मदत करावी ज्यांच्या घरामध्ये पाणी गेले आहे जे स्थलांतरित आहेत त्यांना शासनाने 30 किलो गहू .40 किलो तांदूळ व एक गॅस टाकी मोफत देण्यात यावी व एक महिन्याचे लाईट बिल माफ करावे.महापुरामुळे फार मोठे नुकसान शिरोळ तालुक्यातील जनतेचे झालेले आहे तरी शासनाने त्यांची दखल घेऊन ज्यांच्या गावामध्ये वस्तीमध्ये घरामध्ये पुराचे पाणी शिरते अशा पूरग्रस्तांचे शासनाने पुनर्वसन करून त्यांना घरे बांधून द्यावीत पूर परिस्थितीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व पुरामध्ये वाहून गेलेल्यांना त्यांच्या वारसांना शासनाने पाच लाख रुपये निधी मंजूर करावा व त्या कुटुंबातील मिळवता व्यक्ती जर मरण पावला असेल तर त्याच्या वारसांना शासकीय नोकरी द्यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या वतीने देण्यात आले यावेळी तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी आपल्या भावना राज्य शासनापर्यंत लवकरात लवकर पोहोचवून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही दिली
यावेळी पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संदीप बिरणगे सचिव अरुण भंडारे शिरोळ तालुकाध्यक्ष अजय आवळे कार्याध्यक्ष सचिन बिराणगे रमेश बिरणगे चेतन आवळे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

error: Content is protected !!