“धक्कादायक बातमी” ट्रॅक्टर ट्रॉली महापुराच्या पाण्यात पलटी होऊन सात जण गेले वाहून

Spread the love

अकिवाट गावचा पाणी पुरवठा व शेतीच्या कामासाठी घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली महापुराच्या पाण्यात पलटी होऊन सात ते आठ जण वाहून गेल्याची घटना आज सकाळच्या सुमारास अकिवाट तेथे घडली यामध्ये 4 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे तर अद्याप तिघे बेपत्ता असल्याची माहीती समोर आली आहे.तर एकाची प्रकृती गंभीर आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की महापुरात अकिवाट गावचा बंद पाणी पुरवठा चालू करण्यासाठी व शेतातील केळी काढण्यासाठी नागरिकांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली अकिवाट येथील स्मशानभूमी जवळ असणाऱ्या ओढ्यात पाण्याच्या अंदाज न आल्याने ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली यामध्ये सात ते आठ जण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे यातील चौघांना बाहेर काढण्यात स्थानिक नागरिकांना यश।आले आहे तर अद्याप तिघे बेपत्ता झाले आहेत.दुर्घटनेनंतर नंतर एन डी आर एफ टीम, आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा प्रशासन दाखल झाले आहे.बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे. दुर्घटना स्थळी नागरिकांनी।मोठी गर्दी केली आहे.

error: Content is protected !!