किती दिवस ,किती वर्षे कोल्हापूर ,सांगली जिल्हा हे दुःख सहन करणार आहे ? २००५ राजापूर मधील घटना ,२०१९ ब्रम्हनाळ मधील ती घटना आठवली की अंगावर काटा येतो ! आपल्या डोळ्यासमोर उभा राहतोय तो अकांड तांडव करणारा मृत्यू! त्या अनाथ झालेल्या बालकांचा हंबरडा, त्या अनेक भगिनिंच पुसलेले कुंकू! आणि समाजाची हळहळ!….
आज २०२४ अकिवाटकरांची महापुरात झालेली हानी परत भरून काढणे अशक्य आहे .त्या कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर!होणारी वेदना आपण कशी सहन करणार! आज फक्त आपण स्टेटस ठेवणे, सहानुभूती निर्माण करणे या पलीकडे काहीही करू शकत नाही! याची मोठी मला खंत आहे..!
आज आठ दिवस झाले पाणी ओसरत नाही.कोयना, वारणा,राधानगरी विसर्ग कमी जास्त केला जातोय.केवळ दिलासा! पण या अपरिमित हानीच काय? अलमट्टी मधून ३५०००० विसर्ग काय खोटं काय खरं कोणाला विचारायचं? का आमच्या संकटात भावनांशी खेळण्याचा
हा डाव नियतीचा की ढिसाळ नियोजनाचा! शेतकरी ह्या गोष्टी सहन किती दिवस करू शकतोय,आपल्या गावाच्या जनतेचा विचार करून पाणीपुरवठा सुरळीत चालू द्या यासाठी धडपडणाऱ्या त्या समाजसेवकाच काय चुकल?आज ते आपला जीव गमवून बसले आहेत.
आपल्या मुलाबाळांना,आपल्या बायकोला, नातवंडांना पोरके करून गेलेले आहेत , ह्याच दुःख कोणाला असणार त्या कुटुंबालाच असणार आहे.. ना!
प्रत्येक वेळी सर्वसामान्य जनतेचा जीव जातो !याच्यावर सरकार जर विचार करत नसेल तर याचा उद्रेक सरकारला पेलणार नाही… ह्यासाठी आपण सरकार मायबाप आहात म्हणून कायमस्वरूपी उपायोजना करणे गरजेचे आहे अन्यथा उद्रेक झाला की आपण शांत करू शकणार नाही..!
आपणाला विनंती आहे की शेतकरी थकला आहे सर्वसामान्य जनता थकलेली आहे .आपण कोणताही निर्णय घ्या जेणेकरून महापूर येऊ नये ! आमच्या वरती ही परिस्थिती येऊ नये याची काळजी घ्या एवढीच विनंती करतो
एक त्रस्त पूरग्रस्त..!
विठ्ठल ढवळे (सर)
राजापूर