अक्षरशः थरारक आणि अंगावर शहारे आणणारी मृत्यूकथा

Spread the love

निबीड अरण्य,,, शंभर फुटावरून कोसळणाऱ्या धबधब्याशी दोन हात करून व्हाईट आर्मीच्या जवानानं शोधला मृतदेह,,,,,,, व्हाईट आर्मीच्या शिरपेचात मानाचा तुरा
सातारा / प्रतिनिधी

भात लावण करण्यासाठी गेलेल्या एका बावन्न वर्षाच्या शेतकऱ्याचा पाय घसरून झालेला अपघात,,, थेट घसरून या दुर्दैवी जीवाचे शंभर ते दीडशे फूट जंगलात घसरत जाऊन अक्षरशः उभ्या धबधब्यात जाऊन पडणं,,, आणि जीवाला मुकणं… ही अक्षरशः थरारक आणि अंगावर शहारे आणणारी मृत्यूकथा,,,,! पण ही बातमी समजल्यावर मोबाईलसारख्या संपर्क साधनाची उपयुक्तता नसणं,,, घनदाट जंगलात या दुर्दैवी जीवाची शोधमोहीम राबवताना आलेलं अपयश,,, पण सोबत प्रशिक्षित नसले तरी काटक आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या मोजक्या दोन तीन तरुणांना सोबत घेऊन राबवलेली शोध मोहीम,,, हाताशी केवळ एक दोरखंड आणि जंगलातील कारवीच्या झाडाच्या फ़ांद्या,,, एवढ्या साधन सामुग्रीच्या जोरावर निबीड अरण्यात उभ्या कोसळणाऱ्या उभ्या आणि शंभर ते दीडशे फूट धबधब्याशी संघर्ष करत त्यात पडलेल्या आणि मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याच्या पार्थिव देहाला वर काढण्याची किमया,,,,, ही चित्तर कथा आहॆ व्हाईट आर्मी या नवाजलेल्या आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातल्या स्वयंसेवी संस्थेच्या जिगरबाज संघर्षाची… आपण ज्या दुर्दैवी जीवाला वाचवू शकलो नाही, पण त्याच्या पार्थिवाची हेळसांड न होता अंतिम संस्कारासाठी त्याच्या नातेवाईकाच्या स्वाधीन करता यावा, यासाठी निसर्गाशी दोन हात करून निबीड अरण्यातुन हे पार्थिव सुस्थितीत आणण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सुधीर गोरे याची,,,,,

 

सुधीर गोरे हा तरुण गेली काही वर्षें अशोक रोकडे यांच्या व्हाईट आर्मी या आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील मानाचं पान म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलेल्या संस्थेशी जोडला गेलेला तरुण स्वयंसेवी जवान आहॆ.पनवेल आणि सातारा जिल्हा हे त्याचे कार्यक्षेत्र असले तरी व्हाईट आर्मीच्या इर्शाळवाडी सारख्या अनेक दुर्घटना आणि आपत्ती काळातील बचाव मोहिमामध्ये त्याने आपले सक्रिय योगदान दिले आहॆ. तो पनवेलचा रहिवासी आहॆ.

 

शुक्रवारी म्हणजे 26 जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्याला त्याच्या मित्राचा फोन आला. त्याच्या मित्राचे बावन्न वर्षाचे मेहुणे कृष्णा गणपत वाईकर भात लावण करण्यासाठी डोंगरातील शेतात गेले असताना पाय घसरून डोंगरात पडून खोल धबधब्यात वाहून गेल्याचे समजले. सुधीर गोरे याने तातडीने रात्रीच सातारा जिल्ह्यातील नीत्रळ हे गाव गाठले. सोबतीला गावातीलच तरुण घेतले. या तरुणांना आपत्ती व्यवस्थापनाचा अनुभव नसला तरी खेड्यातील काटक प्रवृत्तीची ही तरुण मंडळी होती. डोंगरातील खोल दरी,,, निबीड जंगल आणि चिखलामुळे घसरणारे पाय अशा अवस्थेत या निबीड जंगलात रात्रभर या टीमने कृष्णा वाईकर यांची शोध मोहीम राबवली..,,, संपर्क साधनाचा अभाव हातात केवळ एक दोरखंड,,, आणि जंगलातील कारवी च्या फांदया तोडून आधारासाठी बनवलेल्या काठ्या या जोरावर त्यांनी रात्रभर कृष्णा वाईकर यांचा जंगलात शोध घेतला. . पण हाती अपयश आले. शेवटी पहाटे शोधमोहीम स्थगित करून ही टीम जंगलातून बाहेर आली.

 

सकाळी पुन्हा जिद्दीने ही शोधमोहीम सुरु करण्यात आली. रात्री फिरलेला भाग सोडून उरलेल्या भागात शोधाशोध करत ही टीम धबधबा डोंगरातून जिथे कोसळतो तिथपर्यंत पोचली. या धबधबयाच्या पात्रात कृष्णा वाईकर यांचा मृतदेह आढळून आला. गावकरी तरुणांनी ओळख पटवली … इथून पुढे खरी कसोटी होती. हेळसांड अथवा विटंबना नं होता हा मृतदेह सुरक्षितपणे जंगलातून,,, तोही उभा चढ चढत जवळपास शंभर ते दीडशे फूट वर नेण्याचा प्रश्न होता.. जोरदार पाऊस,,, पाय निसटण्याचा क्षणोक्षणी असलेला धोका,,,, शिवाय सोबत असलेले तरुण अप्रशिक्षित,,,, आपत्ती व्यवस्थानाचे ज्ञान नसलेले,,,, सुधीर गोरे हा एकटाच आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातला जाणकार,,,पण त्याने हार मानली नाही,,, कृष्णा वाईकर यांचा मृतदेह धबधब्याच्या पत्रातून अलगद बाहेर काढला . दोघा तरुणांचे स्वेटर्स आणि जंगलातील कारवीच्या फांदया तोडून त्याची बनवलेली मोळी याचा चपखल वापर करून स्ट्रेचर तयार केले.या स्ट्रेचरवर मृतदेह बांधून हळू हळू निसर्गाशी दोन हात करत दोरखंडाच्या साहाय्याने वर चढायला सुरुवात केली. यात कसोटी होती ती सुधीर गोरे याची जराशी देखील चूक झाली असती तर मृतदेहासह सगळे जण धबधब्यात कोसळण्याची भीती होती.पण दुर्दैम्य इच्छाशक्ती,,, टीमलीडर सुधीर गोरे याचे वादातीत कौशल्य आणि टीमवर्क याबरोबरच ग्रामीण भागातील काटक तरुणांचे धाडस या जोरावर या तरुणांनी काही तासांचे शर्थीचे प्रयत्न करून कृष्णा वाईकर यांचा मृतदेह चक्क शंभर ते दीडशे फूट वर डोंगर उभा चढ पार करत वर आणला.,,, अगदी सुरक्षित रित्या.,,, त्यानंतर हा पार्थिव देह अंतिम सोपस्कार करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.कृष्णा वाईकर यांचा जीव तर आपल्याला वाचवता आला नाही.पण त्यांच्या पार्थिव देहाची हेळसांड होऊ न देता सुरक्षित पणाने निबीड आणि उभ्या तेही शंभर ते दीडशे फूट खोल दरींतून वर आणता आला.याचे अतीव समाधान मानत सुधीर गोरे पनवेलला परतला यात खरा हिरो ठरला तो व्हाईट आर्मीचा जवान सुधीर गोरे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील आहॆ.व्यवसायाच्या निमित्ताने तो पनवेल मध्ये स्थायिक झाला आहॆ.व्हाईट आर्मीच्या या जिगरबाज जवानाला माझा कडक सॅल्यूट,,

error: Content is protected !!