पुलाची शिरोली उपसरपंचपदी बाजीराव पाटील यांची निवड

Spread the love

पु. शिरोली / प्रतिनिधी

पुलाची शिरोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बाजीराव पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली ही निवड लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली तर ग्रामविकास अधिकारी ए.वाय.कदम हे उपस्थित होते.
शिरोली पुलाची येथील ग्रामपंचायत उपसरपंच अविनाश कोळी यानी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी बाजीराव पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी दिलीप पाटील,सुरेश पाटील,राजेश पाटील,कृष्णात खवरे,कृष्णा करपे,निवास पाटील,निवास कदम,धीरज पाटील, बाबासाहेब कांबळे,बाबासाहेब बुधले,विठ्ठल पाटील ( आबा)संदीप तानवडे,सचिन गायकवाड,सुभाष पाटील, सलीम महात हे नेते मंडळी तर ग्रामपंचायत सदस्य अविनाश अनिल कोळी,सुजाता बाळासाहेब पाटील, महादेव रघुनाथ सुतार,विजय बंडा जाधव,सौ मनीषा संपत संकपाळ,श्रीकांत बापू कांबळे,महंमद युसुफ महात,सौ.कमल प्रकाश कौंदाडे,शक्ती दिलीप यादव कु.वसिफा हिदायतुला पटेल,सौ.कोमल सचिन समुद्रे,कु. हर्षदा दीपक यादव,आरिफ महमद सर्जेखान,सौ.अनिता विठ्ठल शिंदे,नजिया मोहिदिन देसाई, सौ.धनश्री योगेश खवरे आदींसह उपस्थित होते.

error: Content is protected !!