सरकारी अनास्थेमुळे शिरोळ तालुका पुराच्या पाण्यात पुन्हा एकदा बुडत आहे.वेळीच आलमट्टी पाणी साठ्यावर नियंत्रण आणले असते तर आज या गंभीर पूर परिस्थितीला सामोरे जावे लागले नसते असे प्रखर मत आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी शिरोळ तहसील कार्यालयात व्यक्त केले.
शिरोळ तालुक्यातील पूरपरिस्थिती बाबतीत विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार व आमदार डॉ राजेंद्र राजेंद्र पाटील यड्रावकर यांना आज देण्यात आले. निवेदनात म्हटले की जुलै अखेर 50% पेक्षा पाणी साठा आलमट्टी धरणात करता येत नसताना त्यांनी 22 जुलै ला 80% पाणी साठा केला होता.आम्ही याबाबतीत पाणी साठा नियंत्रित करण्याची मागणी केली होती.
पण सरकारने याकडे दुर्लक्ष केले आणि अतिवृष्टी सुरु झाल्यावर पूर परिस्थिती उद्भवली आहे.अजूनही वेळ गेली नाही आलमट्टीचा पाणी साठा कमी करण्यासाठी विसर्ग वाढवायला भाग पाडावे.त्याचबरोबर नदिकाठच्या अनेक गावात महापुराचे पाणी पसरले असल्याने त्यांचे स्थलांतर सुरु आहे.
त्या नागरिकांना आपत्ती कायद्या अंतर्गत सर्व प्रकारच्या सेवा सुविधा देणे तालुक्याचे आपत्ती निवारण प्रमुख म्हणून आपली जबाबदारी आहे.तसेच स्थलांतर नागरिकांची निवारा केंद्रे कुठे केली आहेत त्याची माहिती देणे,निवारा केंद्रापर्यत येण्याची आपण सोय करणे,निवारा केंद्रात त्यांची जेवण पाण्याची आपण सोय करणे,
प्रत्येकाला दररोज भत्ता देणे,त्याचबरोबर पशुधन बाहेर काढण्यासाठी शासनाने वाहने उपलब्ध करावीत व निवारा केंद्रात जनावरांची व्यवस्था आपल्या मार्फत केली पाहिजे.आपत्ती मध्ये नागरिकांच्या व पशु धनाची सर्व जबाबदारी शासन म्हणून आपण घ्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,दिपक पाटील,अक्षय पाटील,अमोल गावडे,भास्कर गावडे, कामिलबाबा इनामदार, उपस्थित होते.