योजनेच्या लाभासाठी महिला भगिनींनी अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन
शिरोळ / प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष व शिरोळचे माजी नगरसेवक डॉ अरविंद माने यांनी शुक्रवारी राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नोंदणी अर्ज पुढील कार्यवाहीसाठी शिरोळ नगरपरिषद प्रशासनाकडे सुपूर्द केले.
माजी नगरसेवक अरविंद माने यांच्या जनसंपर्क कार्यालयात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अर्जाची मोफत नोंदणी करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला या उपक्रमांतर्गत शिरोळ शहर व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने जनसंपर्क कार्यालयात येऊन अर्जाची नोंदणी केली होती.
नोंदणी केलेले सर्व अर्ज शुक्रवारी सकाळी डॉ अरविंद माने यांनी पुढील कार्यवाहीसाठी शिरोळ नगर परिषदेत स्वतः जाऊन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले पालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी डॉ अरविंद माने यांनी प्रशासनात सहकार्य केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले व नोंदणी केलेले अर्ज तात्काळ वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे डॉ अरविंद माने यांना सांगितले
डॉ अरविंद माने म्हणाले की नोंदणी झालेल्या अर्जांची मंजुरी होऊन ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने जुलै व ऑगस्ट महिन्याचे योजनेसाठी जाहीर झालेली रक्कम संबंधित महिला भगिनींच्या खात्यावर जमा होणार आहे अर्ज नोंदणीची मुदत 31 ऑगस्ट 2024 अखेर आहे असल्याने अद्याप ज्या महिला भगिनींनी अर्जाची नोंदणी केली नाही त्यांनी जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून अर्जाची नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी शेवटी केले
यावेळी पालिकेचे सहाय्यक कर निरीक्षक विजयकुमार मुळीक लिपिक अमोल बन्ने सामाजिक कार्यकर्ते भाग्योदय ढवळे राहुल माने अमरजीत कोगे दादासो आवळे नितीन आवळे सुशील पाटील ऋषिकेश कोळी राघव सुतार दगडू जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते