निकाल आम्ही हसतमुखाने स्वीकारला – दिपक पाटील- नाईक

Spread the love
दत्त कारखान्याची पंचवार्षिक निवडणूकमध्ये सत्ताधारी गटाने भांडवलाच्या जोरावर विरोधकांना नामोहरण करण्यासाठी सगळे उपाय अवलंबले.एका बाजूला सर्व कारखानदार पुढारी पक्ष नेते आणि दुसऱ्या बाजूला सामान्य शेतकरी अशी ही लढाई झाली.निवडणुकीचा हा निकाल आम्ही हसतमुखाने स्वीकारत

आहे अशी प्रतिक्रिया दत्त कारखाना बचाव पॅनेल उमेदवार दीपक पाटील यांनी आज गुरुवार दिनांक 25 जुलै रोजी दुपारी 2 वाजता शिरोळ येथे दिली.दिपक पाटील पुढे म्हणाले

या निवडणुकीमध्ये निवडणुकीचा कार्यक्रमच असा होता की चिन्ह मिळाल्यापासून उमेदवाराला फक्त तीनच दिवस प्रचारासाठी दिलेले होते.त्यामुळे तीन दिवसांमध्ये 110 गावं, दोन राज्य 28 हजार सभासदांच्या पर्यंत पोहोचणं सुद्धा मुश्किल होतं.ही लढाई सोपी नव्हती भल्याभल्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम बघून शस्त्र खाली टाकली पण आम्ही लढलो सुद्धा आणि जिंकलो सुद्धा असंच म्हणावं लागेल.कारण सत्ताधारी गटाने  सगळ्या बाबतीत सत्तेचा पुरेपूर उपयोग करून हा विजय मिळवलेला आहे.याउलट एकीकडे पाऊस कोसळत आहे.महापुराचे पाणी वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये सामान्य मतदार मतदान केंद्रांपर्यंतसुद्धा पोचू शकला नाही.त्यामुळे निवडणुकीचा हा निकाल आम्ही हसतमुखाने स्वीकारत आहे.येणाऱ्या काळात
उसाला मागील हंगामाला 3 हजार 500 आणि चालूला 4 हजार भाव मिळाला पाहिजे.
प्रतिभाग सभासद साखर दीडशे किलो मिळाली पाहिजे.सभासदांचा ऊस प्राधान्याने गाळप केला पाहिजे.सभासद बिगर सभासदांना टनेज साखर मिळाली पाहिजे.शेतकऱ्याला खते बियाणे ठिबक या योजना बिनव्याजी पुरवाव्यात वीज प्रकल्प कारखान्याकडे हस्तांतरित करावा
यासाठी लढत राहू असे ग्वाही दिली.तसेच या निवडणूकीत सर्व कार्यकर्ते,निवडणूक प्रशासन,पोलीस प्रशासन,कारखाना कर्मचारी, पत्रकार तसेच सर्व सभासद मतदार यांचे आभार मानले.
error: Content is protected !!