शिरोळ / प्रतिनिधी
गेले महिनाभर सातत्याने पाठपुरावा सुरु आहे पण कोल्हापूर जिल्हाधिकारी किंवा शासन पूर नियंत्रणाबाबत गंभीर नसल्याचे आरोप आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी शिरोळ येथे केला आहे.चुडमुंगे पुढे म्हणाले गेल्या चार दिवसातील पाऊस आणि आलमट्टी धरणातील जादा पाणीसाठा यामुळे शिरोळ तालुक्यासह सांगली कोल्हापूरला पुन्हा महापुराला सामोरे जायला लागेल अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.आज आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग 3 लाख 50 हजार क्यूसेक्स करून पाणी पातळी कमी करावी यासाठी मुख्यमंत्री स्तरावरूनच तात्काळ पाऊले उचलली पाहिजेत.कोल्हापूर व सांगलीचे जिल्हाधिकारी हे कर्नाटकच्या अधिकाऱ्याबरोबर योग्य समन्वय ठेऊ शकले नाहीत म्हणून ही पूर परिस्थिती निर्माण होत आहे.त्यांनी वेळीच कर्नाटक सरकारला पाणी साठा करण्यापासून रोखले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती.
आलमट्टीचा विसर्ग वाढवून शिरोळ तालुक्याला पुरा पासून वाचवले पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्यानुसार सरकारने प्रयत्न न केल्यास आम्ही शुक्रवारी दुपारनंतर शिरोळ तहसीलदार कार्यालयात सर्वाना घेऊन ठाण मांडून बसू असा इशारा ही धनाजी चुडमुंगे यांनी दिला आहे.
2021 ची पुणरावृत्ती
2021 ला आलमट्टी मध्ये 21 जुलै रोजी 95 tmc पाणी साठा होता. 22 जुलैला अतिवृष्टी झाली आणि महाराष्ट्रात महापूर आला.महापूर आल्यावर व नुकसान झाल्यावर आलमट्टीने विसर्ग 4 लाख पर्यंत वाढवला पण पुराणे नुकसान होऊन गेले होते.आता पण तसे व्हायचे नसेल तर आत्ताच कर्नाटक वर दबाव वाढवून विसर्ग वाढवायला लावले पाहिजे.
धनाजी चुडमुंगे
आंदोलन अंकुश संघटना