श्री दत्त कारखान्यासाठी चूरशीने 61.37 टक्के मतदान, 16 हजार 608 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळातील अ वर्ग ऊस उत्पादक आणि अ वर्ग ऊस उत्पादक महिला गट 2 या गटातील संचालक पदाच्या निवडून द्यायच्या 18 जागांसाठी आज (बुधवारी) सकाळी 8 वाजल्यापासून दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर चुरशीने मतदान पार पडले भर पावसातही कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी मतदान केंद्रावर येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला 26726 मतदारांपैकी 16608 एवढ्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याने या ठिकाणी चुरशीने व उत्साहात 61.37 टक्के मतदान झाले
श्री दत्त साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अ वर्ग ऊस उत्पादक गटाच्या 16 जागेसाठी 22 उमेदवार अ वर्ग ऊस उत्पादक महिला गटाच्या 2 जागांसाठी 3 असे एकूण 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया उत्साहात आणि शांततेत पार पडली कारखान्याच्या 26726 मतदारांना मतदान करता यावे याकरिता 9 इमारतीमध्ये 67 मतदान केंद्रांवरती ही मतदान प्रक्रिया घेण्यात आली
सकाळी 8 वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली पाऊस असूनसुद्धा सकाळपासूनच मतदार उत्साहाने मतदान केंद्रावर येऊन मतदान करीत होते कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारपाशी कारखान्याचे चेअरमन व श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलचे प्रमुख सहकारमहर्षी गणपतराव पाटील हे आपल्या उमेदवार आणि सभासद व कार्यकर्त्यांच्यासमवेत मतदारांच्या स्वागतासाठी थांबून होते त्या ठिकाणी येणारे सभासद गणपतराव पाटील यांची भेट घेऊन मतदानास जात होते काही सभासदांनी एका रंगाचे फेटे एका रंगाच्या टोप्या परिधान करून आपण एकत्र मतदानाला आल्याचे दाखवून दिले यानंतर मतदान करून आलेलेही सभासदही गटागटाने येऊन पाटील यांची भेट घेत होते यामुळे ही निवडणूक एकतर्फी असल्याचे सभासदांच्यातून बोलले जात होते गणपतराव पाटील यांचे पॅनेल मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असा विश्वास अनेक सभासदांनी बोलून दाखविला
शिरोळ तालुक्यातील आणि कर्नाटक सीमा भागातील मतदार असणाऱ्या मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी होती तर हातकणंगले तालुक्यातील मतदार असणाऱ्या मतदान केंद्रावर तुरळक गर्दी दिसत होती गणपतराव पाटील गटाचे कार्यकर्ते सभासदांनी मतदान करावे यासाठी दिवसभर परिश्रम घेत होते कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई संचालक अनिलराव यादव विनया घोरपडे संगीता पाटील कोथळीकर यशोदा कोळी शेखर पाटील दरगू गावडे प्रमोद पाटील इंद्रजीत पाटील रणजीत कदम शरदचंद्र फाटक रघुनाथ पाटील यांच्यासह सर्व संचालक माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह अनेक नेते मंडळी येऊन मतदानाचा हक्क बजावला
श्री दत्त कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील 118 गावांमधील सभासद वाहनातून येत होते दिवसभर पाऊस असल्याने मतदारांची वाहने मतदान केंद्र स्थळापर्यंत नेण्यात येत होती तसेच प्रत्येक गावातून मोठ्या प्रमाणात वाहने कारखान्यावर येत असल्यामुळे शिरोळमध्ये वाहनांची मोठी कोंडी होत होती सातत्याने पोलीस कर्मचाऱ्यांना वाहनांची रहदारी सुरळीत करण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागत होते
निवडणूक विभागाच्यावतीने मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती याकरिता 67 मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली होती 402 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती मतदान काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता अधिकाऱ्यांसह 102 पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती
बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली 26726 हजार मतदारांपैकी 16608 एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामुळे एकूण 61.37 टक्के मतदान उत्साहात व शांततेत पार पडले
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ संपत खिलारी जिल्हा उपनिबंधक सुनील धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतदान प्रक्रिया उत्साहात व शांततेत पार पडली दरम्यान झालेल्या मतदानाची मतमोजणी कारखाना कार्यस्थळावरील साखर गोडाऊन क्रमांक 11 येथे आज गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून होणार आहे 67 टेबलांवरती मतमोजणी होणार असून प्रत्येक टेबलावर दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्या ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधीही उपस्थित असणार आहेत.गुरुवारी सकाळी 11 नंतर निकालाचा कौल स्पष्ट होणार आहे मतमोजणी शसाठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे

error: Content is protected !!