शिरोळ / प्रतिनिधी
येथील विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगरभाग शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सहात संपन्न झाली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महर्षि व्यास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे यांनी केले .उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
नविन प्रवेशित विद्यार्थ्यांना विद्यालयाकडून शालेय गणवेश , स्कूल बॅग व शालेय साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थी अमृता लाड , हर्षदा चव्हाण,चैत्राली सावळे,ओंकार लाड,श्रावणी चव्हाण,अस्मिता कांबळे,महेक शेख इत्यादी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात गुरूच महत्व विशद केले.
रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे सचिव मेजर के. एम् भोसले व रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे नूतन सदस्य अमित जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे उपाध्यक्ष शहाजीराव दाभाडे यांनी गुरुचे आपल्या जिवनातील असलेले महत्त्व याविषयी माहिती दिली .
आभार संस्थेचे सचिव मेजर के. एम् भोसले यांनी मानले .सुत्रसंचालन शिक्षक नितिन बागुल व कु हिरकणी कोळी यांनी केले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. भोजलिंग नरळेध सुरेश जाधव,
श्रीकांत जाधव लालासो पाटील,संस्थेचे खजिनदार कृष्णात पाटील,संचालक अमोल चव्हाण,शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते