ट्विंकल स्टार इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Spread the love

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात गुरूचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, ज्याच्या जीवनात गुरूची कमतरता आहे तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही.कारण आपल्या आयुष्याला योग्य दिशा दाखवण्यात गुरुचा मोठा हातभार असतो.अगदी अंगणवाडीपासून ते जिथे नोकरी करतो तिथेही तुमचे मार्गदर्शन करणारे लोक असतात, त्यातील काहींना आपण गुरु समान मानतो.त्यामुळे गुरू-शिष्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.यात भारतीय संस्कृतीत गुरुविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरूपौर्णिमा साजरी केली जाते.हिंदू धर्मात तर गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. याचेच औचित्य साधत पुलाची शिरोली येथील ट्विंकल स्टार इंग्लिश मिडीअम.स्कूलमध्ये शनिवारी विदयाथ्यांनी आपल्या गुरुजनांचे,पलिकांचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणान गुरुपौर्णिम पुजन केले. कार्यक्रमाची सुरुवात स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.मनिषा बाटे यांच्या पादयपुजनाचने सुरवात सर्व शिक्षकांच्या हस्ते पादयपुजन करण्यानआले.सर्व मुलांनीआपल्या आई- वडिल आणि आजी-आजोबा याचे पादयपूजन करून तर कोणी फुले देऊन,मिठाई भरवून गुरुपौर्णिमा साजरी केली. यावेळी स्कूलचे चेअरमन संतोष बाटे,प्रिन्सिपल सो.मनिषा बाटे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन उपमुख्याध्यापिका प्रतीक्षा पाटील आणि सर्व शिक्षिकांनी केले.गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमःगुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही ध्यान,ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्वकाही गुरूंचीच देन माझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद!
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

error: Content is protected !!