प्रल्हाद भोसले यांनी आई वृद्धाश्रमातील वृद्धांच्या सोबत साजरा केला वाढदिवस

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

येथील सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद भोसले हे प्रत्येकच वर्षी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमाने आणि अनावश्यक खर्चाला फाटा देत आई वृद्धाश्रमातील वृद्धांच्या साजरा करत असतात.
भोसले यांनी आपल्या वाढदिवसा दिवशी होणारा अनावश्यक खर्च टाळुन वृद्धाश्रमातील वृद्धांना भोजन जीवन त्यांच्याशी हितगुज करून आपला वाढदिवस आई वृध्दाश्रमामध्येच साजरा केला.
सर्व वृध्दांना आपल्या हातांनी वाढून त्यांच्या सोबतच प्रितीभोजनाचा आस्वाद घेतला.
सर्व वृध्द मातांनी प्रल्हाद भोसले यांचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिला. आणि आपल्या आनंदात आई वृध्दाश्रमातील अनाथ , निराधार वृध्द मातांना सामिल करून घेतले या बदल्यात सर्वांनीच त्यांचे कौतुक केले..
यावेळी त्यांच्या पत्नी,सौ रुपाली भोसले,मुलगी शिवाली भोसले, वैभवी भोसले, देवांश भोसले, रत्नदीप वरपे,अनिकेत गायकवाड, शिल्पा महात्मे,गायत्री महात्मे,रोहिणी माळी, सुजाता माळी, सपना महात्मे ,शरद माळी व मित्र परिवार उपस्थित होता. सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रल्हाद भोसले यांनी दुनियेच्या बाजारात कोठेही विकत न मिळणारा लाख मोलाचा आशिर्वाद मला मिळाला असल्याचे सांगितले

error: Content is protected !!