वारकरी दिंडीसह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात
शिरोळ / प्रतिनिधी
येथे पुरातन काळातील श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. जय हरि विठ्ठल….जय जय श्रीराम कृष्ण हरी …..श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा जयघोष करीत शहरातील हजारो भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी माऊलीचे दर्शन घेतले. मंदिरात या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम भक्तीमय व उत्साहात संपन्न झाले.
सायंकाळी गावातील प्रमुख मार्गावरून वारकरी दिंडी काढण्यात आली टाळ मृदुंगाच्या निनादात विठू नामाच्या गजरात आज अखंड शिरोळ शहर न्हाहून गेले.
आषाढी एकादशीनिमित्त येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विद्युत रोषनाई व फुलांची सजावट करून मंदिराच्या गाभारात आकर्षक आरास करण्यात आली होती.
येथील देसाई परिवाराच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले
विनायकराव घोरपडे ॲड. राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते सहपत्नीक श्री विठ्ठल रुक्माणीच्या मूर्तीस अभिषेक घालून पूजन करून आरती करण्यात आली.
देसाई परिवाराच्यावतीने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले यानंतर मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच वारकरी भाविक भक्तांची मोठी रीघ लागली होती बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय,
श्री राम कृष्ण हरी,जय हरी विठ्ठल, श्री विठ्ठल विठ्ठल ,च्या अखंड नामस्मरणात भाविकांनी आपल्या विठूरायाचे दर्शन घेऊन सुख समृद्धी शांतीसाठी पार्थना केली.
सायंकाळी मंदिरातून वारकऱ्यांची दिंडी निघाली अखंड विठू नामाचा गजर आणि टाळ मृदुंगाचा निनादात शहरातील प्रमुख मार्गावरून दिंडी काढण्यात आली या दिंडीचे नागरिकांनी उत्साहात स्वागत करून पालखीचे पूजन केले.
श्री आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित केलेल्या सर्व धार्मिक कार्यक्रमासाठी देसाई परिवारातील ज्येष्ठ रावसाहेब देसाई, धनाजीराव देसाई, जयसिंगराव देसाई, शशिकांत देसाई,यशवंत उर्फ बंटी देसाई ,राजेंद्र देसाई, पृथ्वीराज देसाई, धीरज देसाई, गुरुदत्त देसाई, सिद्धतेज देसाई यांच्यासह श्री विठ्ठल भक्त हणमंत उर्फ दादासाहेब इंगळे, बाळासाहेब जगदाळे,
उल्हास पाटील ,आनंदा बन्ने ,राजेंद्र काळे, प्रसाद कदम, चंद्रकांत भाट ,आप्पासो हंकारे ,नितीन कोळी यांच्यासह भक्तगणांनी विशेष परिश्रम घेतले.यानिमित्त प्रवचन कीर्तन यासह विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाले.