गरीब सेनेचे रूपांतर आंबेडकरवादी स्वराज्य पार्टीत : सतीश भंडारे,नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

दलित मुस्लिम समाजावरील अन्याय अत्याचार व उपेक्षितांच्या न्याय मागणीसाठी लढणाऱ्या गरीब सेनेचे रूपांतर आंबेडकरवादी स्वराज्य पार्टीत करण्यात आले असून अध्यक्षपदी आंदोलक नेते व गरीब सेनेचे संस्थापक सतीश भंडारे यांची तर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी राजेंद्र दिंडे (शाहूवाडी) कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी मौलाना इरफान चांद यांची निवड करण्यात आली.

 

शिरोळ येथील शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ नेते बाबालाल चिंचवडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गरीब सेनेचे रूपांतर आंबेडकरवादी स्वराज्य पार्टीत करून नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.

 

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर बोलताना सतीश भंडारे म्हणाले की सध्या देशात व महाराष्ट्रात राज्यात दलित, मुस्लीम, गोरगरीब जनतेवर होत असलेले अन्याय अत्याचार याला वाचा फोडण्यास कोणतीच संघटना व पक्ष काम करत नसून फक्त आर्थिक स्वार्थ कसा साधला जाईल, पोट कसे भरता येईल, समाजावरील अन्याय दूर

 

न करता आर्थिक तडजोड करून लोकांची घुसमट करून स्वताचे पोट भरण्याकडेकडे अनेक पक्ष व संघटना काम करत आहेत. त्यामुळे जनता खास करून दलित, मुस्लीम भयग्रस्त झाली आहेत. जातीवाद, धर्मवाद असे विभाजन करून गेल्या 10 वर्षात भाजपाने भारताच्या

 

संविधानालाच हात घालून ते नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.वाढती महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचा बेजबाबदारपणा,दंगली या सर्व घटनांमुळे जनतेला सध्या आधार हवा आहे तो एका लढाऊ पार्टीचा म्हणून आम्ही गेल्या दोन वर्षात गरीब सेना या नावाने काम करणाऱ्या संघटनेचे आक्रमक, राजकारण करून सत्ता घेऊन या

 

जनतेला भयमुक्त करणारा आंबेडकरवादी स्वराज्य पार्टी या पक्षात रूपांतर करत आहे.आज शिरोळ या क्रांतीच्या भूमीत अनेक पक्ष संघटनांनी जन्म घेऊन महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले आहेत आम्हीही त्याचप्रमाणे गरीब सेनेचे रूपांतर “आबेडकरवादी स्वराज्य पार्टीत

 

 

करून.आजपासून महाराष्ट्रात दलित मुस्लीम गोरगरीब जनतेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या विरुध्द आक्रमक भूमिका येऊन समाजाला आधार देण्याचे काम करणार आहोत. निवडणुका लढवून राजकीय ताकद दाखवून देणार आहोत.

 

 

आंबेडकरीवादी म्हणजेच सविधानवादी, माणुसकीवादी, समतावादी होय म्हणून आम्ही एक नवीन स्वराज्य आणण्याचा प्रयत्न करणार आहेत.आमचा सिम्बॉल हा लेखणी म्हणजेच पेन, गती, प्रगतीचे चक्र अशोकचक्र, व आम्ही वीर योद्धे आहेत म्हणून तलवार हे तिन्ही एकत्र करून तपार केला आहे नवीन पार्टीचा झेंडा हा सर्वोच्य असलेल्या आकाशाचा निळा रंगाचा आहे.

 

 

क्रांतीची बीजे जे आपल्या लेखणीतून, पोवाडे यातून पेरणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या एका वाक्याचे ब्रीद वाक्य घेतले आहे. ॥ जग बदल घालुनी घाव । सांगून गेले मला भिमराव ।। हे आहे.
तेव्हा दलित मुस्लिम यासह सर्व आबेडकरवादी स्वतःला समजून चळवळीत काम करणारे लोक कार्यकर्त्यांनी या आंबेडकरी स्वराज्य पार्टीत सहभागी होऊन संघटनेला

 

 

बळ द्यावे तसेच नूतन पदाधिकाऱ्यांनीही सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच झटत राहावे असे आवाहन त्यांनी केले.या बैठकीस सुधाकर तावदारे किशोर खोत छाया लोखंडे उत्तम यशवंत बाबासो कांबळे मिलिंद कांबळे पार्वती गोसावी वैशाली हेरवाडे गुंडा खोत

 

 

राजश्री भंडारे शुभम कांबळे शरद कांबळे ऋषिकेश भंडारे प्रजय आवळेकर शरद भोरे अमोल आवळे संगीता खोत शुभम दिंडे इरफान सय्यद निवास कांबळे मंगल भंडारे बिबू गोसावी चंद्रकांत बंडगर साहेबराव भंडारे सयाजीराव भंडारे श्रीगुरु कुंभार संदीप भोरे मिथुन कांबळे गंगाराम परीट बाबासो ऐवाळे यांच्यासह आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!