शिरोळ / प्रतिनिधी
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, श्री राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठलाच्या जयघोषात येथील राजाराम विद्यालय नं. 2 च्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडी काढून वारकरी संप्रदायातील संस्कृतीचे दर्शन घडविले.
आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी सालाबादप्रमाणे राजाराम विद्यालयातील विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी काढण्यात आली अखंड विठू नामाच्या गजरात विठ्ठल रुक्मिणीच्या आणी वारकरी पोशाखात टाळ मृदुंगाच्या निनादात शहरातील प्रमुख मार्गावरून ही दिंडी काढण्यात आली.
आपल्या देशातील सांस्कृतिक परंपरेची जोपासना करण्यासाठी शाळेच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वारकरी दिंडीतील विद्यार्थ्यांनी शहरातील अनेक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
शाळेचे मुख्याध्यापक सनी सुतार अध्यापक रवींद्र वाघ सुनील घुमाण्णा त्रिशला येळगुडे प्रतिभा साळोखे
सविता गावडे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे सदस्य भाग्यश्री चव्हाण सारिका सकट सचिन सावंत चंद्रकांत भाट मारुती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचे नागरिकांनी उत्साहात स्वागत केले.