शिरोळ : प्रतिनिधी
येथील जुना कुरुंदवाड रस्त्याच्या दुतर्फा शिरोळ नगरपरिषद आणि रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांच्यावतीने मंगळवारी सकाळी एक मंडळ एक झाड या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची हाणी होत आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे.यामुळे शिरोळ नगर परिषदेच्यावतीने शहरातील सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून एक मंडळ एक झाड हा उपक्रम राबविण्यात येत आहे.मंगळवारी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळचे पदाधिकारी व नगर परिषदेचे अधिकारी
कर्मचारी यांच्यावतीने जुन्या कुरुंदवाड रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले.रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील,सचिव मेजर प्रा के एम भोसले,खजिनदार चंद्रकांत भाट,इव्हेंट चेअरमन महेश माने,सदस्य डॉ अतुल पाटील,संजय शिंदे,सचिन सावंत, पालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
लावलेल्या झाडांच्या संरक्षणाकरिता रोटरी हेरिटेज सिटी कडून ट्रीगार्ड लावण्यात आले.यावेळी सार्वजनिक तरुण मंडळांनी एक मंडळ एक झाड या उपक्रमांतर्गत शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य नगरपालिकेने राबवलेल्या सामाजिक उपक्रमात नेहमीच सहभागी राहुन शिरोळच्या वैभवात भर घालण्यासाठी प्रयत्नशील राहतील असे आश्वासन रोटरी हेरिटेज सिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी दिले.
वृक्षारोपणासाठी लागणारे ट्री गार्डसाठी रोटरीचे सदस्य डॉ अरविंद माने,आप्पालाल चिकोडे,शरद उर्फ बापू मोरे, संजय तुकाराम शिंदे,सुरेश देशमुख यांनी सहकार्य केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते बंटी जाधव,पापाभाई झांबरे, पालिकेचे शिरोळ शहर समन्वयक साहिल मकानदार,
विशाल पांढरे, संदीप महात्मेप्रशिक कांबळे,दुर्वांकुर मोहिते,विनायक लोंढे यांच्यासह रोटरी हेरिटेज सिटीचे सदस्य पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.