श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्तभक्तांना दक्षिणद्वार सोहळ्याची प्रतीक्षा !

Spread the love

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा या दोन पवित्र नद्यांची पाणीपातळीत वाढ झाल्याने आज सोमवार दिनांक 15 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता श्री दत्त मंदिरात पाणी आल्याने असंख्य दत्तभक्त व ग्रामस्थांना दक्षिणद्वार सोहळ्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.नृसिंहवाडी येथे दक्षिणद्वार योगावर स्नान करण्यासाठी भक्त वाट पाहत आहेत.कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 5 ते 6 फुटाने वाढ झाल्याने येथील श्री दत्त प्रभूंच्या चरणकमलाला स्पर्श करण्यास दोन फूट पाणी कमी आहे.मध्यरात्री दक्षिणद्वार सोहळा होईल अशा शक्यता दत्त देवस्थान ट्रस्टने व्यक्त केली आहे. सोहळ्यात मंदिराच्या दक्षिण बाजूच्या दरवाजात स्नान करण्यासाठी इचलकरंजी,जयसिंगपूर,सांगली,कोल्हापूर, उगार,चिकोडी,बेळगाव यासह अनेक ठिकाणांहून भाविक हजेरी लावतात.अजूनही मुख्य दत्त महाराजांच्या मंदिरात कृष्णा नदीचे पाणी पोहोचलेले नाही.त्यामुळे असंख्य भाविक दक्षिणद्वार सोहळ्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून समोर वाहणारी कृष्णा नदी दक्षिण दिशेकडे वाहते.दक्षिणद्वार सोहळ्यावेळी मंदिराच्या उत्तरद्वारातून शिरलेले कृष्णा नदीचे पाणी श्रींच्या मनोहर चरणकमलाला स्पर्श करीत मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडते.यालाच दक्षिणद्वार सोहळा असे म्हणतात.यावेळी दक्षिणद्वारातून बाहेर पडणाऱ्या नैसर्गिक तीर्थात स्नान करणे म्हणजेच पुण्यकारक मानले जाते.या सोहळ्यात स्नान केल्याने  पापांचा ऱ्हास होऊन पुण्यप्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा आहे.

error: Content is protected !!