शिरोळ / प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जय घोषात शिरोळहून स्वामी भक्तांची पायी दिंडी रविवारी सकाळी अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाली यावेळी स्वामी भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
गेल्या पंधरा वर्षापासून शिरोळमधील श्री स्वामी समर्थ भक्त मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिरोळ ते अक्कलकोट पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते अक्कलकोट येथे पायी दिंडी पोहोचल्यानंतर गुरुपौर्णिमे निर्मित श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे महाप्रसादाचे वाटप करण्याची सेवा हे सर्व स्वामीभक्त त्या ठिकाणी
करत असतात प्रत्येक वर्षी हा उपक्रम राबविला जातो
रविवारी सकाळी येतील श्री स्वामी भक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या निवासस्थानापासून पायी दिंडी सोहळ्याची सुरुवात झाली बाळासाहेब चव्हाण आयझाक भोरे उमेश कोळी राजेंद्र गायकवाड मोहन माने यांच्या हस्ते पूजन व श्रीफळ वाढवून दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
स्वामीभक्त संजय उर्फ संभाजी चव्हाण, सत्यजित उर्फ बबलू काशीद, बाबुराव मोरे,तुकाराम मोरे, नितीन मिणचे, दत्तात्रय जगदाळे, अनिल कोळी, दिलीप पाटील, तुकाराम उर्फ दिपक पाटील, प्रकाश कोळी,अमोल माने, देवेंद्र काशीद,आनंदा किल्लेदार, उल्हास पाटील,भिमा जाधव,, गौरव गायकवाड,प्रकाश कुरडेकर(निपाणी),
सचिन पोतदार, अक्षय काशीद,निरंजन सुर्यवंशी, ओंकार काशीद, निखिल मोरे, उत्कर्ष उर्फ बंडु शिरगुप्पे,पारस भाट, शिवराज भोसले,अवधुत कोळी, पृथ्वीराज माने,प्रणव पाटील, शंतनु चव्हाण, आदित्य नाईक, सुशांत आरगे, ओंकार कोळी, अनिकेत काटकर, राजु कोळी(आचारी),उदय आरगे, शुभम कोळी, हणमंत जगदाळे
यांच्यासह स्वामीभक्त या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात स्वामी भक्तांची पायी दिंडी अक्कलकोटला रवाना झाली.
स्वामी भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी जयसिंगपूर बाजार समितीचे संचालक शिवाजी चव्हाण,दिपक मोहीते, यासिन शेख, अविनाश कांबळे, हर्षवर्धन कांबळे, चंद्रकांत भाट, उल्हास पाटील,विनोद मुळीक, प्रफुल कोळी, धनाजी आरगे, सुशांत चव्हाण, अशोक माने चुडमुंगे, दादासो पाटील यांच्यासह स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.