शिरोळ डॉक्टर असोसिएशन व रोटरी हेरिटेज सिटीकडून वारकऱ्यांची आरोग्य सेवा

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ डॉक्टर्स असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी यांचे संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या आषाढी वारी दिंडी सोहळ्यातील पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची तोंडले येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करून आरोग्यसेवा करण्यात आली.

 

सन 2016 पासून दरवर्षी आषाढी वारी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना आरोग्यसेवा पुरवली जाते. सदर तपासणी शिबिरामध्ये वारकऱ्यांचे जनरल चेकअप, रक्तदाब तपासणी , जखमी वारकऱ्यांची मलमपट्टी करण्यात आली. तसेच ज्या वारकऱ्यांवर ताप, सर्दी, खोकला, उलटी, जुलाब, चक्कर येणे, थकवा , अशक्तपणा जाणवणे अशा लक्षणानुसार योग्य ते औषधोपचार करण्यात आले.सदर शिबिराच्या माध्यमातून शेकडो वारकऱ्यांची आरोग्य सेवा करण्यात आली.

 

सदर आरोग्य शिबिरामध्ये डॉ चेतन राजोबा, डॉ शेखर पाटील, डॉ संदीप गायकवाड , डॉ प्रमोद हेगडे , डॉ अतुल पाटील यांनी वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली तर योगेश मोहिते, सुहास पाटील ,अरविंद चौगुले, सचिन चौगुले, निलेश कदम ,रणजित आवळे , सागर आवळे यांनी वारकऱ्यांची मलमपट्टी व सेवासुश्रुषा केली.

 

वारकऱ्यांचे तपासणी शिबीर यशस्वी होण्यासाठी शिरोळ डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी सर्व पदाधिकारी डॉ अमरसिंह माने देशमुख, डॉ किशोर खामकर तसेच रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळचे अध्यक्ष तुकाराम पाटील , सेक्रेटरी प्रा के एम भोसले खजिनदार चंद्रकांत भाट , चैतन्य फार्मस्युटिकलं एजन्सीचे प्रमुख सुरेश देशमुख , महांकाली फार्मस्युटिकलचे प्रमुख संजय माने यांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!