गाव तेथे भारतीय जनता युवावॉरिअर्स शाखा स्थापन करा : अनुप मोरे
शिरोळ : प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष डॉ.अरविंद माने यांच्या नेतृत्वाखाली चारही विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी युवा वॉरिअर्सच्या शाखा प्रत्येक गावात स्थापन कराव्यात असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री तथा युवा वॉरिअर्स महाराष्ट्र प्रदेश संयोजक अनुप मोरे यांनी केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथे नागाळा पार्कातील भाजपा कार्यालयात भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वमधील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी अनुप मोरे यांनी मार्गदर्शन केले.
भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर म्हणाले की भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून भारतीय जनता युवा मोर्चाचा विस्तार करण्यासाठी गाव निहाय कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून युवा वॉरिअर्सच्या शाखा निर्माण कराव्यात असे त्यांनी सांगितले.
भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र विभाग समन्वयक निवेदिता एकबोटे बोलताना म्हणाल्या की भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावागावात नव मतदारांची नोंदणी करून घ्यावी त्यांना आपल्या युवा मोर्चात सहभागी करून लोकोपयोगी कामे करून घ्यावेत असे आवाहन त्यांनी केले.
भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष डॉ अरविंद माने बोलताना म्हणाले की कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी युवा मोर्चाच्या विस्तारासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत.गाव तेथे युवा वॉरिअर्स शाखा काढून त्या ठिकाणी नव मतदार नोंदणी करण्यात येईल प्रत्येक घराघरात कार्यकर्ते जाऊन शासनाच्या विविध योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेला देण्यासाठी प्रयत्नशील राहतील असे आश्वासन त्यांनी दिले.
या प्रसंगी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष तथा कोल्हापूर ग्रामीण प्रभारी विजयेंद्र माने,भाजयुमो प्रदेश उपाध्यक्षा प्रियाताई पवार , प्रदेश सचिव अजित कुलथे प्रदेश सचिव रौनक शेट्टी , विद्यार्थी विभाग प्रदेश संयोजक रमाकांत कापसे यांच्यासह भाजयुमो कोल्हापूर पूर्व मधील जिल्हा सरचिटणीस नामदेव सातपुते, रविराज गाताडे,
सौरभ पाटील, प्रियांका जाधव, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत बुगले,सुभाष कोरे,शुभम टोणे, ओंकार घाटगे,संभाजी बन्ने, सचिन पोवार, चिदानंद कोटगी, दिपक रावळ, उमेश तांबे, रमेश चव्हाण, उमाताई ठिगळे जिल्हा चिटणीस पुजा सूर्यवंशी,प्रवीण रांगोळे, ओंकार भातमारे,
सागर खावरे, संतोष खरात सोशल मीडिया संयोजक संतोष बिराजदार, आत्मनिर्भर भारत संयोजक अविष्कार शिंदे, युवा वॉरिअर्स संयोजक राजेंद्र जाधव,मंडल अध्यक्ष विश्वास माने, नितीन आरगे, ओंकार बुरांडे, यांच्यासह सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.