‘दुर्दैवी घटना’ ऊस पिकात औषध फवारणी करताना उच्च दाबाच्या तारेचा करंट बसून शेतकऱ्यांच्या जागीच मृत्यू

Spread the love

ऊस पिकात तननाशक औषध फवारणी करताना उच्च दाबाची तारेचा करंट बसून शेतकऱ्यांच्या जागीच मृत्यू

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

ऊस पिकात तननाशक औषध फवारणी करताना उच्च दाबाची लाईटची तार ( वायर ) अंगावर पडून ४३ वर्षीय शेतकऱ्याचा करंट ( शाॅक ) बसून जागीच मृत्यू आज सकाळी १० वाजण्यासुमार नागांव येथे घडली मयत शेतकऱ्याचे नागांव सुनिल बापू शिंदे असे आहे सुनिल हा एका गरीब कुटुंबातील कष्टाळू होता त्याच्या अशा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नागाव गावात खळबळ माजली आहे. या घटनेमुळे महावितरणच्या भोंगळ कामावर प्रश्न उपस्थित होत आहे.
नागांव ता हातकणंगले येथील मयत सुनील शिंदे हा शिरोली एमआयडीसी मधील एका कंपनीत काम करत होता. काल रात्रपाळी करून तो सकाळी घरी आला त्याने आपल्या शेता शेजारी असणाऱ्या कोल्हापूर येथील काटे नामक व्यक्तीची शेती भागाणे (वाटेकरी ) कसण्यासाठी घेतली होती त्यामध्ये ऊसाच्या पिकाची लागवड करून ऊसाचे पिकाची चांगल्या प्रकारची वाढ होऊन उत्तम क्वालिटीचे पिक येण्यासाठी शेतातील तन मारण्यासाठी त्यावर सुनिल हा तन नाशक औषध फवारणी करत असताना अचानक पणे २४० व्होल्टेज असेलेली उच्च दाबाची तार ( वायर ) त्याच्या अंगावर पडल्याने त्याला जोराचा करंट ( शाॅक ) बसून त्याचा जागीच मृत्यू झाला . हि घटना सुनिलच्या शेता शेजारी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना सुनिलचा जोराचा आईगं म्हटल्याचा आवाज ऐकू आल्याने घटनास्थळी धाव घेवून पाहीले असता तर सुनीलच्या अंगावर तार तूटून पडल्याने सुनिल निपचिप पडल्याचे दिसता त्यानी तारेमध्ये करंट असल्याने समजताच पुढे न जाता महावितरणच्या कर्मचाऱ्यांना व गावातील नागरिकांना कल्पना देताच सर्वजण घटनास्थळी धाव घेवून सुनिलला तारेखालून बाहेर काढले .
पावसाळा सुरू होण्या अगोदर या शेत परिसरातील खांबावरील निकृष्ट झालेले कंडक्टर व अन्य साहित्य बदलून त्याठिकाणी नविन साहित्य चार पाच महिण्यापूर्वी बदलण्यात आले असल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या महावितरण कर्मचारी व काही शेतकऱ्यांनी सांगितले मग हे सर्व साहित्य नविन बदलून जर अशा प्रकारची घटना घडू शकत असेल तर महावितरणच्या भोंगळ कामकाजाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे . आशा प्रकाचे निकृष्ट दर्जाचे कामकाज महावितरण कंपनीकडून होत असेल तर सुनिल सारख्या कित्तेक शेतकर्यांना आपला जीव गमवावा लागणार असा सवाल ही उपस्थित होत आहे ? एका गरीब कुटुंबातील कष्टाळू तरूणाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने नागाव गावात खळबळ माजली.

error: Content is protected !!