शिरोळ बेंदराचा कर तोंडणीचा ऐतिहासिक क्षण…

Spread the love
शिरोळ एक भुईकोट किल्ला ऐतिहासिक नगरी आणि या ऐतिहासिक शिरोळ नगरीचा बेंदुर सण आणि या बेंदराचा कर तोंडणीचा ऐतिहासिक क्षण…
————————————————–
छत्रपती शाहुकालीन करवाीर संस्थानचा भाग म्हणुन मिरज किल्ला, शिरोळ किल्ला ते चिंचणी रायबाग पर्यतचा भाग हा आपल्या करवीर संस्थानमध्ये समाविष्ठ होता.श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांनी बेंदुर सणाची संकल्पना त्यांनी वेगळ्या पध्दतीने साजरा करणे ची सुरुवात केली.
महाराजानी संस्थान काळातुनच” कर्नाट‌क बेंदुर” साजरा करणेस चालना दिली.यासाठी शिरोळमधील कोळी समाज बांधवाना शिरोळ भुईकोट किल्याच्या वेशीवरच त्यांची वस्ती वसवली.कोळी समाज आणि बेंदुर सण याचे विशेष महत्व आहे.
या समाजामार्फत पुर्ण गावात म्हणजेच शिरोळ,आगर आणि नृसिंहवाडी या गावातील घरांच्या चौकटीभोवती चुण्याचे छप्पे मारले जातात चौकटीला लिंबाचे व पिंपळाचे पानाचे तोरणे ही सर्व मंदिरांंना गांव चावडीला गावातील पूर्वापार मानकरी यांच्या घराला.तसेच गावकामगार पोलिस पाटलांच्या घराला,बांधली जातात.
कोळी समाजामध्ये आता समाज मोठा झालेने हे सर्व नियोजन करण्याचे काम वर्षाला प्रत्येक वेगवेगळ्या समुहाकडे (खुटाकडे) जात असते याबदलात मिळणारे धनधान्य समाजातील लोक वाटुन घेतात.या कार्याबद्दल शाहुराजानी या समाजाला ईनाम म्हणुन काही शेतजमिनी
दिल्या आहेत.अजुनसुध्दा या जमिनी “ईनाम पट्या”
म्हणुन प्रचलित आहेत.यावर्षीच्या बेंदराच्या नियोजनाचा मान श्री गणपतराव राऊ कोळी याचे चिरंजीव श्री.नितीन गणपतराव कोळी याचे समुहाकडे (खुटाकडे)आला आहे.
या समाजामार्फत गावच्या ऐतिहासिक वेशीमध्ये बेंदराच्या आदल्या दिवशी लिंबाचे व पिंपळाचे डहाळे याचे तोरण सर्व कोळी समाज बांधवामार्फत मिरवणुकीने वाजत,गाजत बांधले जाते.यानंतर छत्रपती शिवाजी महाराज तक्तामधील ऐतिहासिक महत्त्व असलेली
छत्रपती ताराराणीसाहेब यांच्या गादीला मानाचा मुजरा घेऊन हे तोरण कापण्याचे महतभाग्य परंपरागत गावकामगार “पोलिस पाटील” घराण्याचे वंशज असलेले अजिंंक्य पाटील, धैर्यशिल पाटील,विशाल पाटील,नागेश पाटील यांचे शुभहस्ते चावडीतील ऐतिहासिक अशा
मानाच्या तलवारीने मंगलवाद्यांच्या गुजरात वाजत गाजत आणले जाते आणि तोरण कापले जाते.यानंतर गावातील बळीराजाचे प्रतिक असलेल्या” बैलजोडीची” सजावट करुन मंगल वाद्यांच्या निनादात मिरवुणुक काढली जाते असा आहे.आमच्या शिरोळचा “कर्नाटकी बेंदुर..”… मोठ्या उत्साहाने आणि आनंदात साजरा केला जातो.
शब्दांकन..✍️
शशिकांत पवार शिरोळ.
error: Content is protected !!