“धक्कादायक” नदीपात्रात पोत्यात भरलेल्या अवस्थेत महिलेचा सापडला मृतदेह

Spread the love

कवठेसार नदीपात्रात पोत्यात भरलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडला

कवठेसार तालुका शिरोळ येथील हद्दीत वारणा नदी पात्रात अंदाजे 60 ते 70 वयाच्या महिलेचा पोत्यात भरलेला पाण्यात फुगलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला इचलकरंजीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील जयसिंगपूर पोलीस उप अधीक्षक डॉक्टर रोहिणी सोळंखे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके दानोळी प्राथमिक आरोग्य अधिकारी सौ. ए.एन.मोघे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.व अतिरिक्त पोलीस अधिक्षक यांनी तपासाच्या दृष्टीने सूचना केल्या.मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी आज शुक्रवार सकाळी 11 च्या दरम्यान कवठेसार येथील वारणा नदी पात्रात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत शेती पाणीपुरवठा करणाऱ्या नदीतील विद्युत मोटारीच्या पाईपला अडकून थांबलेले व या पोत्यातून दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले.

पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांनी याची माहिती जयसिंगपूर पोलिसांना दिली तातडीने घटनास्थळी पोलीस अधिकारी व पोलिसांची टीम दाखल होऊन बांधलेल्या अवस्थेतील पोते नदीपात्रातून बाहेर काढले असता 60 ते 70 वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला.घटनास्थळी पंचनामा करण्यात आला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी घातपाताचा संशय व्यक्त करीत तपासाची चक्रे गतिमान केली आहेत तसेच या वयाच्या महिला बेपत्ता असतील तर संबंधित नातेवाईकांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!