शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित शिरोळ या संस्थेच्या चेअरमन पदी शिरोळ चे सुपुत्र सुदर्शन कोळी यांची बिनविरोध निवड झाली.निवड सभेच्या अध्यक्षस्थानी ए.बी.नादरे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरोळ हे होते.
त्यानिमित्त आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने धन्वंतरी पतसंस्थेचे चेअरमन महेश देशमुख यांचा शुभहस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी संस्थेच्या व्हाईस चेअरमन वैशाली लाटे मॅडम,संस्थेचे आधारस्तंभ व माजी चेअरमन उदय भोसले,बांधकाम अभियंता संदेश बदडे,
बॅ.खर्डेकर पतसंस्थेचे चेअरमन उत्तम कोळी, संचालक बबलू सनदी,संतोष कोळी,अनिल कोळी,सूर्यकांत कोडोले,सुनिल कोळी,संदिप हालडे,बुरुटे,जमीर आरकाटे,सुहास कोळी,विश्वनाथ जाधव यांचेसह
संचालक मंडळ, संस्थेचे सचिव राजेंद्र पाटील,क्लार्क सतिश आवळे उपस्थित होते.विविध मान्यवर,युवक मंडळे,मित्रमंडळी यांचे मार्फत सत्कार व सदिच्छा देण्यात आल्या.