शिरोळ / प्रतिनिधी
येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर नं.3 शिरोळ या शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष 24 25 सालाकरिता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या नवागतांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले शिरोळ शहरातील जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळामध्ये शाळा प्रवेशोत्सव समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला यानिमित्ताने शाळेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी विद्यामंदिर नं .3 या ठिकाणी पहिलीच्या विद्यार्थ्यांना डोक्यावरती टोपी हातामध्ये फुगे आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचे झांज पथक आणि लेझीम या पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यानंतर नवागतांचे वर्गामध्ये प्रवेश करत असताना त्यांच्या पावलांचे ठसे उमटवण्यात आले व औक्षण करून वर्गामध्ये बसवण्यात आले पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व अंकलिपी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात आला
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप कोळी उपाध्यक्षा स्वाती कोळी सदस्य शैलजा कोरोचीकर उदय माळी गुलनाज शेख आरती आरगे अमर फडतारे शुभम कांबळे बजरंग धनगर सुनीता गंगधर स्नेहलता कांबळे दीपक शिंदे राजेंद्र माने कुमुदिनी कांबळे जायटंस ग्रुप ऑफ शिरोळच्या पदाधिकारी हेमलता जाधव मुख्याध्यापिका तेजस्विनी गायकवाड अध्यापिका शशिकला पाटील सुरेखा येळगुडे जयश्री पेटकर सविता जाधव यशवंत कांबळे यांच्यासह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते