इचलकरंजी असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स & अर्किटेक्ट्स अध्यक्ष पदी इंजि.राजेंद्र खंडेराजुरी,सचिव पदी आर्कि.विकास नाईक व खजिनदारपदी इंजि.नितीन शेट्टी यांची निवड
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथील असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स & अर्किटेक्ट्सच्या अध्यक्ष पदी इंजि.राजेंद्र खंडेराजुरी, सचिव पदी आर्कि.विकास नाईक खजिनदारपदी इंजि. नितीन शेट्टी व सहसचिव पदी इंजि.भारत केट काळे यांची निवड झाली.सदर निवड हि सन २०२४ ते २०२६ या दोन वर्षासाठी आहे.
संस्थेच्या ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १५ जून रोजी संस्थेच्या नूतन वास्तूमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली.सभेच्या अध्यक्ष पदी इंजि.रियाज सत्ती हे होते. स्वागत व मनोगत इंजि.विवेक सावंत यांनी केले.
विद्यमान संचालक यांची कार्यकारिणी मुदत संपल्यामुळे इंजि.रमेश मर्दा यांना निवडणूक अधिकारी नेमून संस्थेची २०२४ – २६ करिता नवीन संचालक यांची नावे जाहीर करून पुढील कामकाज त्यांचेकडे सोपविणेत आले.सदर नवीन कार्यकारिणीत अध्यक्ष पदी इंजि.राजेंद्र खंडेराजुरी,
सचिव पदी आर्कि.विकास नाईक व खजिनदारपदी इंजि.नितीन शेट्टी,सहसचिव पदी इंजि.भारत केट काळे व संचालक पदी इंजि.सुधाकर झोले आर्कि विठ्ठल तोडकर, आर्कि.सचिन बोरा,इंजि.गिरीश मोकाशी,इंजि. रवींद्र तोरस्कर,इंजि.सुहास रूगे व आर्कि.प्रकाश मालवीय
तसेच निमंत्रित सदस्य पदी आर्कि. तन्वी कुलकर्णी व आर्कि.आसिया पटेल यांची निवड करणेत आली.मावळते अध्यक्ष इंजि. विवेक सावंत यांनी उपस्थित माजी अध्यक्ष यांचे हस्ते सर्व नूतन कार्यकारिणी यांची नावे जाहीर करून त्यांचा सत्कार व पदग्रहण सोहळा पार पडला.
आभार आर्की तन्वी कुलकर्णी यांनी मानले. सदर सभेसाठी संस्थेचे माजी अध्यक्ष व संस्थेचे सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.