शिरोळ / प्रतिनिधी
सामाजिक शैक्षणिक क्रीडा यासह विधायक कार्यात अग्रेसर असणारे व रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळचे सदस्य बालरोग तज्ञ डॉ अतुल पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत शिरोळ परिसरातील काही गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारत त्यांना शैक्षणिक साहित्याची भेट दिली. डॉ अतुल पाटील यांनी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे
परिसरातील गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी नेहमीच डॉ अतुल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे यामुळे परिसरातील काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेऊन वाढदिवसानिमित्त होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा दिला अशा गरजू विद्यार्थ्यांना वर्षभर लागणारे शैक्षणिक साहित्य त्यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी भेट देऊन वर्षभर शैक्षणिक दृष्ट्या लागणारी मदत करण्याचे आश्वासन दिले
डॉ अतुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष संजय तुकाराम शिंदे सेक्रेटरी तुकाराम पाटील (भैय्या) ट्रेझरर संजय रामचंद्र शिंदे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील (माऊली)सदस्य संजीव पुजारी राहुल यादव प्रा के एम भोसले डॉ उमेश कळेकर डॉ अजितकुमार बिरनाळे डॉ अरविंद माने डॉ सुभाष भंडारे अनिकेत जोशी चंद्रकांत भाट उल्हास पाटील सचिन सावंत विवेक फल्ले अप्पालाल चिकोडे शरद उर्फ बापू मोरे विराजसिंह यादव भरत गावडे श्रीकांत जाधव गजानन पाटील परशुराम चव्हाण संदीप कांबळे रणजीत जगदाळे महेश माने यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.