“धक्कादायक” पेट्रोल टाकून दुकान पेटवताना व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Spread the love

टोप येथील महामार्गाच्या पूर्व भागात असणारा मटण मार्केट जवळील नारायण बोंगार्डे यांच्या रायबा चहा व समर्थ स्नॅक्स पॉईंट रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न झाला असून सुदैवानं यामध्ये कोणतेही मोठे नुकसान झाले नसले तरी या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे.दरम्यान काही दिवसापूर्वी याच दुकानामध्ये २५ हजाराची चोरी झाली होती.पण सीसीटिव्ही नसल्याने चोरट्यांचा तपास लागला नाही.रविवारी रात्री झालेली घटना व्हिडिओ सिसीटिव्ही मध्ये कैद झाला असून तर दुकान पेटवताना मोठ्या भडका उडाल्याचे व्हीडिओ मध्ये दिसत आहे.सदर घटनेची पुलाची शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात आज

नोंद झाली आहे.पोलिसांनी अश्या गोष्टीवर तसेच चोरावर अंकुश ठेऊन बंदोबस्त करावा अशी मागणी व्यावसाईकातून होत आहे.

error: Content is protected !!