जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण : चंद्रकांत भाट

Spread the love

राजाराम विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

शिरोळ / प्रतिनिधी

शिक्षणाच्या बाजारीकरणात पालकांचा ओढा खाजगी शाळांकडे वाढत असून शिक्षण संस्थेकडून देणाऱ्या आमिषाला बळी पडत आहे पण स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधूनच विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याने या शाळांमधील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यशस्वी गरुड भरारी घेतली आहे यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे असे प्रतिपादन राजाराम विद्यालय शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व पत्रकार चंद्रकांत भाट यांनी केले
येथील राजाराम विद्यालय नं. २ या शाळेत शनिवारी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले या समारंभात चंद्रकांत भाट बोलत होते
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे रांगोळी घालून औक्षण करून तसेच चिमुकलांचे पावलांचा ठसा उमठावीत विविध शैक्षणिक साहित्याची भेट देत स्वागत करण्यात आले तसेच शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना गोड जिलेबीचे भोजन देण्यात आले
या समारंभात शिरोळ पंचायत समिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयातील पर्यवेक्षिका छाया कोहाडे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे उपाध्यक्षा सौ शितल जगदाळे अध्यापक सनी सुतार यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य अभिजीत माने सचिन सावंत मारुती जाधव सदस्या सौ प्रियंका इंगळे मनीषा जाधव भाग्यश्री चव्हाण शाळेच्या अध्यापिका सुनंदा पाटील त्रिशला येळगुडे मीनाक्षी हेगाण्णा यांच्यासह विद्यार्थी पालक अंगणवाडी सेविका मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका नीता चव्हाण यांनी केले

error: Content is protected !!