पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
मौजे वडगाव तालुका हातकणंगले येथील विद्या मंदिर मौजे वडगाव या प्रशालेत प्रवेशोत्सव 2024 उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी जे. टी.पाटील,जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी ए.एस कटारे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रवेशोत्सवानिमित्त नवागत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके तसेच मोफत गणवेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सळसळत्या उत्साहामुळे पहिल्याच दिवशी चांगली उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाळेचे मुख्याध्यापक कोठावळे सर आणि उपमुख्याध्यापिका चव्हाण मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी आराध्या लोहार हीची शासकीय क्रीडा प्रबोधिनीत निवड झाल्याबद्दल तसेच सुनील गरड आणि त्यांचे कुटुंबीय यांनी शालेय परिसराचे जतन आणि संवर्धनात दिलेल्या योगदानाबद्दल शाळेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.विस्तार अधिकारी ए एस कटारे यांनी शाळेच्या कामकाजाबद्दल आपल्या मनोगतात विशेष कौतुक केले. गटशिक्षणाधिकारी श्री पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक जगाला धैर्याने सामोरे जाण्याचे आणि आदर्श नागरिकत्वाच्या मूल्यांची जोपासना करण्याचे आवाहन केले.सदर कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल चौगुले, उपसरपंच रघुनाथ गोरड, अविनाश पाटील, पत्रकार प्रकाश कांबरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.सदरच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमास मौजे वडगाव च्या सरपंच कस्तुरी पाटील, केंद्रप्रमुख आर.बी. पाटील, ग्राम विकास अधिकारी आरती ढेंगे, ग्रामपंचायत सदस्य सुनील खारेपाटणे, दिपाली तराळ , सुवर्णा सुतार, माजी सरपंच काशिनाथ कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष लोंढे, पत्रकार श्री हंकारे, माजी अध्यक्ष संदीप मगदूम, कर्मचारी ज्ञानेश्वर सावंत यांच्यासह शिक्षण प्रेमी ग्रामस्थांची, पालकांची उपस्थिती होती.
प्रारंभी कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक अध्यापक देवदत्त कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन योगेश पाकले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक कोठावळे सर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सायली चव्हाण ,फिरोज मुल्ला, वैशाली कुंभार, रिजवाना नदाफ, सविता कांबळे, वैशाली कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.