राजेंद्र हायस्कूल अंबप येथे पहिल्याच दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे वह्या पुस्तके व पेन देऊन स्वागत करण्यात आले.विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून शासन दरवर्षी नवनवीन कल्पना राबवत असते. याच अनुषंगाने राजेंद्र हायस्कूल अंबप येथे सर्व नवागत विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून त्यांना पहिल्याच दिवशी वह्या, पुस्तके,पेन व गोड खाऊ वाटप करण्यात आला.सदर प्रसंगी विद्यालयात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.बी.के.पाटील साहेब आदरणीय लोकरे तात्या व श्री. पी.एस.लोकरे सर* उपस्थित होते.
प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते आदरणीय शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रति वर्षाप्रमाणे कै.विलासराव लोकरे व कै.बाबुराव लोकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदरणीय लोकरे तात्या व श्री.पी.एस. लोकरे सर यांनी विद्यार्थ्यांना *स्वखर्चाने वह्यांचे वाटप केले.
श्री.बी.के.पाटील साहेब यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन शिक्षणाचे महत्त्व समजावून दिले. त्याचप्रमाणे आदरणीय लोकरे तात्या यांनी गरीब परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देऊन शिक्षण हाच यशाचा मार्ग असल्याचे सांगितले.त्याचप्रमाणे श्री.पी.एस. लोकरे सर यांनी विद्यार्थी कसा असावा, राष्ट्र घडणीत विद्यार्थ्यांची भूमिका याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सर्वांना यशस्वी होण्याचा मूलमंत्र दिला.
अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. केकरे बी.डी. सर यांनी शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयी मान्यवरांना, पालकांना व विद्यार्थ्यांना माहिती देऊन विद्यालयातील प्रत्येक घटक हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असेल अशी ग्वाही दिली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *श्री.कुंभार वाय. एस.सर* व *सौ.पाटील बी.एस.* मॅडम यांनी केले प्रास्ताविक *श्री. शेरखाने एन. आर. सर* यांनी केले तर आभार *श्री. शेटे. के.बी.* सर यांनी मानले.
सदर कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.