रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळच्या अध्यक्षपदी तुकाराम पाटील

Spread the love

रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळच्या अध्यक्षपदी तुकाराम पाटील
सचिवपदी के एम भोसले तर खजिनदारपदी चंद्रकांत भाट यांची निवड

शिरोळ / प्रतिनिधी

जागतिक स्तरावर सामाजिक क्षेत्रात आग्रणीय असणाऱ्या रोटरी क्लब या जागतिक सामाजिक संस्थेमधील रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळच्या अध्यक्षपदी रोटे तुकाराम पाटील (भैय्या) यांची तर सचिवपदी मेजर प्रा के एम भोसले यांची व खजिनदारपदी पत्रकार चंद्रकांत भाट यांची एकमताने निवड करण्यात आली
रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष संजय तुकाराम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीकरिता रोटरी सदस्यांची सभा रोटरी हेरिटेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली या सभेत अध्यक्षपदी रोटे तुकाराम पाटील सचिवपदी रोटे मेजर प्रा के एम भोसले खजिनदारपदी पत्रकार रोटे चंद्रकांत भाट यांची एकमतांनी निवड करण्यात आली नूतन पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्या माध्यमातून शिरोळ शहर व परिसरात सामाजिक व विधायक उपक्रम राबवून समाजातील गरजूंना मदतीचा हात देत शिरोळ परिसराच्या वैभवात व नावलौकिकात भर टाकण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे आश्वासन नूतन अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी दिले
या बैठकीस रोटे संजय पाटील संजीव पुजारी विराजसिंह यादव संजय रामचंद्र शिंदे डॉ अजितकुमार बिरनाळे डॉ अतुल पाटील डॉ अरविंद माने डॉ उमेश कळेकर संदीप कांबळे रणजीत जगदाळे आप्पालाल चिकोडे श्रीकांत जाधव गजानन पाटील सचिन सावंत विवेक फल्ले राहुल यादव अनिकेत जोशी शरद उर्फ बापू मोरे उल्हास पाटील परशुराम चव्हाण भरत गावडे महेश माने डॉ सुभाष भंडारे शिवाजी कोळी यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते

error: Content is protected !!